MI vs RCB IPL 2026 saam tv
Sports

MI vs RCB: व्हिलन कोण? मुंबईने गमावला सलग तिसरा सामना; जाणून घ्या पराभवाची ५ प्रमुख कारणं

MI vs RCB IPL 2026: वानखेडेवर आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. कोहली, सॉल्ट आणि पाटीदारच्या दमदार फलंदाजीमुळे मोठा स्कोर उभा राहिला. गोलंदाजांची खराब कामगिरी आणि रोहित शर्माच्या दुखापतीमुळे मुंबईला सामना गमवावा लागला.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रविवारी रंगलेला सामन्यात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या हाती निराशाच आली. मोठ्या लक्ष्य पाठलाग करताना शेवटच्या ओव्हर्समध्ये शेरफेन रदरफोर्डने जोरदार फटकेबाजी केली. मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. या सामन्यात कोणत्या कारणांमुळे मुंबईचा पराभव झाला ते पाहूयात.

फिल सॉल्ट आणि विराट कोहलीची दमदार सुरुवात

आरसीबीच्या डावाची सुरुवातच आक्रमक झाली. फिल सॉल्टने फक्त 36 चेंडूत 78 रन्स केले. तर विराट कोहलीने दुसऱ्या टोकाला स्थिर खेळ करत 38 चेंडूत 50 रन्स केले. या दोघांनी मिळून 120 रन्सची पार्टनरशिप केली. आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना सुरुवातीपासूनच दबावाखाली आणलं होतं. हार्दिक पांड्याने अनेक गोलंदाज बदललं पण सुरुवातीला विकेट मिळाली नाही.

रजत पाटीदारची तुफान खेळी

गोलंदाजीमध्ये यश मिळाल्यानंतर मुंबईला थोडीशी आशा निर्माण झाली होती. मात्र तेव्हाच रजत पाटीदारने तुफान खेळी केली. त्याने केवळ 20 चेंडूत 53 रन्स करत सामन्याची दिशा बदलली. त्याचा स्ट्राईक रेट 265 होता. त्याच्या फटक्यांमुळे आरसीबीचा स्कोर चांगलाच वाढला.

रोहित शर्माची दुखापत

मुंबईसाठी मोठा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी रोहित शर्मा अचानक दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्याने 13 चेंडूत 19 रन्स केले होते. पण त्याच्या जाण्याने टीमची फलंदाजी विस्कळीत झाली. त्याचं प्रेशर इतर खेळाडूंवर पडलं

सुयश शर्माची गोलंदाजी

आठव्या ओव्हरमध्ये लेगस्पिनर सुयश शर्माने सामना फिरवला. त्याने एका ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. रायन रिकेल्टन (37) आणि तिलक वर्मा (1) यांना आऊट केल्यानंतर मुंबईचा रनरेट कमी झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला डाव सावरण्याची जबाबदारी घ्यावी लागली.

अपयशी गोलंदाजी

मुंबईच्या मुख्य गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. ट्रेंट बोल्टने 50 रन्स दिले तर मयंक मार्कंडेची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. जसप्रीत बुमराहला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आरसीबीच्या फलंदाजांनी दबदबा कायम ठेवला आणि मोठा स्कोर उभारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT