virat kohli and marcus stoinis clash  Twitter
Sports

IND VS AUS: राडाच ना! भर मैदानात कोहली अन् स्टोइनीस भिडले, 'या 'कारणामुळे आले आमने सामने - VIDEO

Virat Kohli And Marcus Stoinis: सामना रोमांचक स्थितीत असताना दोघांमध्ये काहीतरी घडलं ज्यामुळे दोघेही आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते.

Ankush Dhavre

Virat Kohli and Marcus Stoinis Clash: चेन्नईच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनीस एकमेकांना भिडताना दिसून आले.

विराट कोहली आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखला जातो. फलंदाजी करत असो किंवा क्षेत्ररक्षण, तो नेहमीच आक्रमक दिसून येत असतो.

तिसऱ्या वनडे सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. हा सामना सुरु असताना विराट कोहली मार्कस स्टोइनीस एकमेकांना भिडताना दिसून आले. सामना रोमांचक स्थितीत असताना दोघांमध्ये काहीतरी घडलं ज्यामुळे दोघेही आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest sports updates)

तर झाले असे की, डावातील २१ वे षटक सुरु होते. त्यावेळी मार्कस स्टोइनीस गोलंदाजी करत होता. चेंडू टाकल्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा आपल्या रनअपच्या दिशेने जात होता. तर विराट कोहली नॉन स्ट्राईकला जात होता.

त्यावेळी विराट कोहली मार्कस स्टोइनीसला धक्का देताना दिसून आला. मात्र यात दोघांचाही वाद घालण्याचा हेतू नव्हता. कारण कोहलीने धक्का मारल्यानंतर मार्कस स्टोइनीस हसताना दिसून आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव..

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २६९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.१ षटकात २४८ धावांवर संपुष्ठात आला.

विराट कोहलीची ५४ आणि हार्दिक पंड्याची ४० धावांची खेळी वगळली,तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील निकाल वाचनाला सुरुवात

Monsoon Eye Care : डोळ्यांची जळजळ अन् लाल झालेत का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

MPSC FDA Recruitment: अन्न व औषध प्रशासनात नोकरीची संधी; पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती

Khalapur Toll Plaza : बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई; खालापूर टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT