Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad by 35 Runs Saam Digital
Sports

RCB Won Against SR: होम ग्राउंडवर हैदराबादचं सपशेल लोटांगण; बेंगळुरूला तब्बल १ महिन्यानंतर विजयाचा सूर गवसला

IPL 2024, RCB vs SRH Match Winner: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हैदराबादवर ३५ धावांनी विजय मिळवला.

Sandeep Gawade

आयपीएलच्या मागच्या काही सामन्यांमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आज  रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासमोर सपसेल लोटांगण घातलं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हैदराबादवर ३५ धावांनी विजय मिळवला. विराट कोहली आणि पाटीदारच्या शानदार खेळीच्या जोरावर बेंगळुरूने २०६ धावांच लक्ष्य ठेवलं होतं. मात्र बेंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादचा संघ गडगडला.

या मोसमातील बेंगळुरूचा हा दुसरा विजय आहे. संघाने 9 पैकी 7 सामने गमावले आहेत. मात्र, या विजयानंतरही संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे हैदराबादला या मोसमात तिसरा पराभव पत्करावा लागला असला तरी हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

आरसीबीच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका रजत पाटीदारने बजावली. त्यांने 20 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 250 च्या स्ट्राइक रेटने खेळीत 5 षटकार आणि 2 चौकार लगावले. त्याच्याशिवाय कॅमेरून ग्रीनने नाबाद 37 धावा करत 25 धावांची खेळी केली. विराट कोहलीने 43 चेंडूत 51 धावा केल्या. कर्ण शर्माने 29 धावा देत 2 बळी घेतले. स्वप्नील सिंगने 40 धावा दिल्या पण त्याने ट्रॅव्हिस हेड आणि क्लासेनचे विकेट घेण्यात यश मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT