RCB vs SRH IPL 2023 trvis head record breking century 4th fastest and fastest fo srh in ipl amd2000
RCB vs SRH IPL 2023 trvis head record breking century 4th fastest and fastest fo srh in ipl amd2000 twitter
क्रीडा | IPL

Travis Head Century: चिन्नास्वामीवर ट्रेविस हेड गरजला! स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत मोडले सर्वच रेकॉर्ड

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाज ड्रेसिंग रूममधूनच सेट होऊन येत असल्याचं दिसून येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात ट्रेविस हेडने वादळी खेळी करत शतक झळकावलं आहे. हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांची डोकेदुखी वाढवत अवघ्या ३९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाजाने झळकावलेलं पहिलच शतक ठरलं आहे. आपल्या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार ठोकले.

आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत ३ शतकं झळकावली गेली होती. विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकी खेळी केली होती. याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने शतक झळकावलं होतं. दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतकी खेळी केली. ट्रेविस हेड हा आयपीएल २०२४ स्पर्धेत शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

हेडने हे शतक अवघ्या ३९ चेंडूत पूर्ण केलं. हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील चौथे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने ३० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं होतं. तर युसूफ पठाणने ३७ चेंडूत आणि डेव्हिड मिलरने ३८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

तो या स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यासह आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड अॅडम गिलख्रिस्टच्या नावे होता. त्याने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाचं प्रतिनिधित्व करताना ४२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

SCROLL FOR NEXT