Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Mumbai Mega block : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून शुक्रवार १७ मे ते शनिवार ,१ जून दरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mega block
Mega blockSaam Digital

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून शुक्रवार १७ मे ते शनिवार ,१ जून दरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी-विद्युतीकरणा संबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आजपासून पुढेच १५ दिवस रात्री १२वाजून १४ मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लँटफॉर्म क्रमांक १० आणि ११ वर २४ डब्याचा मेल- एक्सप्रेस गाड्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे लांबी वाढविण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरु आहे. आता अभियांत्रिकी-विद्युतीकरण संबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवार १७ मे ते शनिवार ,१ जून दरम्यान दररोज रात्री सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा अप धीमा, अप-डाउन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिकेवर असणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत.

१२.१४ वाजताची शेवटची लोकल

१७ ते २० मे दरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम होणार आहे. यामध्ये सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ वाजताची कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कल्याणहून रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. सीएसएमटीहून पहाटे ४.४७ वाजता कर्जत ही पहिली लोकल असणार आहे. ठाण्याहून पहाटे ४ वाजताची सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे. ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

Mega block
Mhada Pune: आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण

दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२५३३ लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस ,ट्रेन क्रमांक ११०२०भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी ,ट्रेन क्रमांक १२०५२मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ,ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक १११४० होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस,ट्रेन क्रमांक २२२२४साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस,ट्रेन क्रमांक १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहे.

दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस

ट्रेन क्रमांक २२१५७सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, ट्रेन क्रमांक ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्सप्रेस, २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, आणि ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला दादरहून सुटणार आहे

पनवेल स्थानकात रद्द आणि रवाना

ट्रेन क्रमांक २०१११सीएसएमटी –मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस पनवेल स्थानकातून सुटेल आणि ट्रेन क्रमांक १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यतच चालविण्यात येणार आहे.

Mega block
Borghat Waterfall : ऐन उन्हाळ्यात धबधबे झाले प्रवाहित; मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांना वेगळा अनुभव, पाहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com