rcb vs kkr twitter
Sports

KKR vs RCB: RCB चा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय! पहिल्या लढतीत अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग XI

KKR vs RCB Playing XI: आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात दोन्ही नवे कर्णधार नाणेफेकीसाठी आले होते. श्रेयस अय्यर गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृ्त्व करताना दिसून आला होता. मात्र यावेळी अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येत आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. त्यामुळे कोणता कर्णधार विजयाने खातं उघडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Playing XI): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रासिख दर सलाम, सुयश शर्मा, जॉश हेजलवूड, यश दयाल.

कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंकृष रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रामंदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT