smriti mandhana twitter
Sports

RCB vs DC, WPL: स्मृती मंधानाचा स्टायलिश शॉट! गुडघ्यावर बसून खेचला षटकार; VIDEO एकदा पाहाच

Smriti Mandhana Six Video: रॉयल चॅलेंजर्स संघाची आक्रमक फलंदाज स्मृती मंधानाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टायलिश षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ महिला प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे. हा संघ या हंगामातही चॅम्पियनसारखा खेळ करतोय. पहिल्याच सामन्यात विजयाने खातं उघडल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. यावेळीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना आक्रमक फलंदाजी करताना दिसून येत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघविरुद्ध झालेल्या सामन्यातही स्मृती मंधानाची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. या फटकेबाजीच्या बळावर तिने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान तिने एक स्टायलिश षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यात फलंदाजी करताना स्मृतीने शानदार अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान तिने डॅनियल वॅट जी हॉजसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दिल्लीने पहिल्या डावात फलंदाजी करताना १९.३ षटकअखेर सर्वबाद १४१ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४२ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून पूर्ण केलं.

स्मृती मंधानाचा शानदार षटकार

तर झाले असे की,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून पावरप्लेमध्ये ५ वे षटक टाकण्यासाठी अरुंधती गोलंदाजीला आली.

या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर स्मृतीने गुडघा टेकून ऑफ साईडच्या बाहेर पडलेला चेंडू खोदून काढला आणि लाँग ऑफच्या दिशेने क्लासिक षटकार मारला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Moon 2025 : चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लाल का दिसतो? खगोलशास्त्रीय कारण

Hair Care Tips : मऊ अन् चमकदार केस पाहिजेत? फेकण्याऐवजी वापरलेल्या चहा पावडरचा 'असा' करा वापर

Sajjangad Fort: मन शांत-प्रसन्न करायचंय? साताऱ्याजवळ असलेल्या सज्जनगडाला नक्की भेट द्या

Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

Chest Pain : छातीचं दुखणं की हार्ट अटॅकचे लक्षण? कसा ओळखाल 'या' दोघांमधील फरक?

SCROLL FOR NEXT