Sakshi Sunil Jadhav
"सुख आले दारी असा दिवस आहे" आपली मंगळाची असणारी रास. जमिनीचे व्यवहाराशी निगडित घनिष्ठ संबंध आहे. आज असे व्यवहार चांगले पार पडतील. वाहन आणि मातृसौख्य उत्तम.
बहिणीची विशेष माया आणि प्रेम काय आहे हे जाणवेल.कला, मनोरंजन क्षेत्रात चांगली भरारी माराल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. दिवस आनंदी आहे.
वडिलोपार्जित संपत्तीचे व्यवहार सुरळीत होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सहकार्याने पुढे जाल.
आजचा दिवस शुभ वार्ता घेऊन आलेला आहे. मनोवांछित गोष्टी घडतील. सुखाचा शोध... असा काहीसा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.
नव्या काही गोष्टींची खरेदी होईल.खर्च वाढता राहील . कोणाची तरी जबाबदारी उचलावी लागेल. मानसिकता सांभाळा.
मित्र-मैत्रिणींच्या सहवासामध्ये दिवस आनंदी राहील. प्रेमाला एक वेगळी झळाळी मिळेल. सून जावयांच्या स्नेहामुळे भारावून जाल. अनेक लाभ होतील.
समाजाशी आपण काहीतरी देणे आहोत आहोत हे आज जाणवेल. एखाद्या चांगल्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्याल. एखाद्या राजकारण्याने व्यक्तीशी घनिष्ठ संबंध येइल. दिवस संमिश्र आहे.
नातवंडांचे सुख लाभेल. चांगल्या वार्ता कानावर येतील. लांबचे प्रवास होतील. व्यवसायामध्ये मोठ्या काहीतरी घटना घडतील. कुलस्वामिनीची उपासना करावी.
अपघाताचे योग आहेत.वाहने जपून चालवावीत. अचानक काही घटना घडतील ज्याला आज आपल्याला सामोरे जायला लागेल.
जोडीदाराशी अबोला संभवतो आहे. विनाकारण एखाद्या गोष्टीवरून खटका उडेल. पण व्यवसायिक क्षेत्रामध्ये घोडदौड होईल.
एखादे संशोधनात्मक कार्य करण्यासाठी दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. नाविन्याच्या शोधामध्ये आज राहाल. आपल्या हाताखाली लोकांच्याकडून योग्य ते सहकार्यामुळे मिळाल्यामुळे कामाला गती येईल.
दत्तगुरूंची उपासना आपल्याला चांगली ठरणार आहे. संततीच्या बाबतीत उत्तम बातम्या कानी येतील. कला, क्रीडा क्षेत्र, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना दिवस सुखद जाणार आहे.