Sakshi Sunil Jadhav
नवीन कपडे आणि मेकअप सोबतच, तुमचा दिवाळी लूक पूर्ण करणारी एक गोष्ट म्हणजे तुमचे फूटवेअर. परफेक्ट फूटवेअरच्या वापराने तुमचा लूक आणखी सुधारतो.
जर तुम्हाला या दिवाळीत तुमच्या पारंपारिक कपड्यांसोबत कोणते फूटवेअर निवडायचे असा प्रश्न पडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी ७ ट्रेंडी फूटवेअर घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही दिवाळीसाठी ग्लॅमरस लूक करणार असाल, तर बॅकस्ट्रॅप हील्स हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपारिक पोशाखांसोबत या हील्स छान दिसतात.
शुज नेहमीच पारंपारिक पोशाखांवर शोभून दिसतात आणि या दिवाळीत तुम्ही सोनेरी, सिल्व्हर किंवा रंगीत अॅम्ब्रॉयडरी शूज वापरू शकता. जे कोणत्याही लेहेंगा किंवा साडीसोबत मॅच होतील.
जर तुम्ही दिवाळीसाठी लेहेंगा घालण्याचा विचार करत असाल, पण तुम्हाला हील्स नको असतील, तर तुम्ही सोनेरी स्नीकर्स वापरून पाहू शकता.
तुमची दिवाळी अनोखी आणि वेगळी दिसावी यासाठी, साड्या, सूट आणि शरारा हील्ससोबत मिड-टॉप ब्लॉक सँडल हील्स घाला, याने तुम्ही आकर्षक दिसाल.
दिवाळीत सगळीकडे प्रकाश असतो त्यातच तुम्ही मिरर-वर्क सँडल घालून तुमचा लूक करू शकता. ते स्टायलिश दिसतात आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांसोबत चांगले मॅच होतात.
दिवाळीच्या आकर्षक लूकसाठी सोनेरी किंवा चांदीचे धातूचे सॅन्डल्स परफेक्ट आहेत.
जर तुम्ही मित्रांसोबत दिवाळी पार्टीला जात असाल तर ओपन-टो ब्लॉक-हील सँडल घालण्याचा विचार करा. ते भारतीय पोशाखांना एक सुंदर टच देतात आणि तुमचे सौंदर्य वाढते.