Sakshi Sunil Jadhav
सणावारांना महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स विकत घेतात. त्यात महत्वाचे म्हणजे डोळ्यांच्या पापण्यासाठी अनेक जण खरेदी करायला विसरतात.
पुढे आपण सणावारांना सुंदर दिसण्यासोबत डोळ्यांच्या पापण्यांना कर्ल कसं करायच्या याच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत. कारण सुंदर चेहरा दिसण्यासाठी पापण्याही महत्वाच्या असतात.
डोळ्यांच्या पापण्यांना आकर्षक दिसण्यसाठी महिला मस्काऱ्याचा वापर करतात. त्याने डोळे लांबूनच रेखीव सुंदर दिसतात.
तुम्हाला माहितीये का, पापण्या कर्ल करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत जे काही विविध कलर्समध्ये ही उपलब्ध आहेत.
पुढे आपण पापण्यांना कर्ल करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात.
तुम्ही वॅस्लीन लावून सुद्धा पापण्यावर करु शकता. त्याने लॅशेस कर्ल होतात.
तुम्ही ब्लो ड्रायरने पापण्या कर्ल करू शकता. त्यासाठी ड्रायर गरम करा. मग लहान कंगव्याने धरा आणि नंतर ब्लो ड्राय करा.
कर्लिंग केल्यानंतरच मस्कारा लावा. तो आधी लावल्याने पापण्या तुटू शकतात. त्यामुळे हा नियम पाळायला विसरु नका.
पापण्यांना केलेला कर्ल जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी, फक्त वॉटरप्रूफ मस्करा वापरा.
ज्या महिलांना मस्कारा लावल्याने टोळ्यात पाणी किंवा आणखी समस्या जाणवतात. त्यांनी कृपया या टिप्स फॉलो करु नये.