RCB VS CSK IPL 2025 X
Sports

RCB VS CSK : आरसीबीला मोठा धक्का! चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मॅच विनर खेळाडू संघाबाहेर

RCB VS CSK IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात एमएस धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता आरबीसीचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.

Yash Shirke

चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बंगळुरूचे शिलेदार फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

बंगळुरूला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. हा सामना जिंकल्यानंतर बंगळुरूच्या खात्यात एकूण १६ गुण जमा होतील. दुसऱ्या बाजूला चेन्नईसाठी हा सन्माची लढाई आहे. टॉसच्या वेळेस सुद्धा महेंद्रसिंह धोनीने आयपीएल २०२५ मध्ये उरलेल्या ४ सामन्यांवर लक्ष आमचे असल्याचे म्हटले. हे सामने पुढच्या सीझनच्या हिशोबाने चेन्नईसाठी महत्त्वपूर्ण आहेत. चेन्नईच्या आजच्या प्लेईंग ११ मध्ये एकही बदल नसल्याचे धोनीने सांगितले.

दुसऱ्या बाजूला रजत पाटीदारने सर्व खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आपापली जबाबदारी योग्यपणे निभावत असल्याने संतुष्ट असल्याचे म्हटले. प्रत्येक सामना महत्त्वाचा असल्याने तशीच कामगिरी करण्याचा निर्धार असेल असेही आरसीबीचा कर्णधार म्हणाला. टॉस झाल्यानंतर रजत पाटीदारने आजच्या सामन्यात जॉश हेजलवूडच्या जागी लुंगी एनगिडीला प्लेईंग ११ मध्ये संधी दिल्याची घोषणा केली. हेजलवूड हा बंगळुरूसाठी महत्त्वाचा गोलंदाज आहे. तो पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नसण्याचा परिणाम बंगळुरूच्या गोलंदाजी विभागावर होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार) आयुष म्हात्रे, शेख रशीद, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीपक हूडा, अंशुल कंम्बोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना

(इम्पॅक्टचे पर्याय - शिवम दुबे, आर. अश्विन, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ -

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, जेकब बेथल, देवदत्त पड्डिकल, रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल

(इम्पॅक्टचे पर्याय -सुयश शर्मा, रसिख डार, मनोज भांडगे, लियाम लिविंगस्टन, स्वप्नील सिंह)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT