IPL 2025 मधून चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या सीझनमधून बाहेर पडणारी पहिली टीम सीएसके आहे. आज चेन्नईचा संघ चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरूशी भिडणार आहे. बंगळुरू सध्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. पण हा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये १० सामने खेळले आहेत. त्यातील ७ सामन्यांमध्ये आरसीबीचा विजय झाला आहे, तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलवर बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीकडे १४ गुण आहेत. त्यांना २ गुण मिळवून प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याच्या आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता ७० टक्के आहे. मागील दोन दिवसांपासून बंगळुरूमध्ये सतत पावसाच्या धारा कोसळत आहेत. याशिवाय आज सामन्यादरम्यानही पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही संघांच्या सराव सत्रादरम्यानही पाऊस पडला होता. सीएसकेला काल (२ मे) फक्त ४५ मिनिटे सराव करता आला. दुसऱ्या बाजूला पावसामुळे आरसीबीला ट्रेनिंगसेशन रद्द करावे लागले.
राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलवर मोठी उडी मारली. ते अजूनही टेबल टॉपर्स आहेत. काल (२ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात विजय मिळवत गुजरातने दुसरे स्थान गाठले. त्यामुळे बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानी गेला. आजचा सामना जर आरसीबीने जिंकला तर ते प्लेऑफच्या स्पर्धेत टॉप २ मध्ये जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.