Shubman Gill: शुबमन गिल आऊट की नॉटआऊट? थेट चौथ्या पंचांकडे गेला मॅटर

Shubman Gill Out Or not out : अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि सनराझजर्स हैदराबादमध्ये आज भिडत होणार आहे. गुजरातच्या संघाला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
 Shubman Gill
Shubman Gill Out Or not outsaam tv
Published On

गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२५चा ५१ वा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतोय. या सामन्यात एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गुजराजच्या संघाने शानदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. गुजरातने फक्त २ विकेट गमावत २००चा टप्पा पार केला. शुबमन गिलने सामन्यात चांगली कामगिरी करत एक अद्भुत अर्धशतक झळकावलं. गिलने सामन्यात ३८ चेंडूत ७६ धावा केल्या.

साई सुदर्शन बाद झाल्यानंतर गिलनेही आपली विकेट गमावली. मात्र गिलच्या रन आऊट होण्यावर मोठा वाद झाला. दोन्ही तिन्ही पंचांच्या निर्णयानंतर गिलनं थेट आपला वाद चौथ्या अंपायरकडे नेला. याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत, त्यात गिल बाद नसल्याचं दिसत आहे. काय आहे व्हिडिओ- यात धाव काढताना शुबमन गिलला हैदराबादच्या यष्टीरक्षकानं केलं.. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या थ्रो हातात येण्याआधीच यष्टीरक्षकाचा हात लागला होता, असं व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसत आहे.

साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी धमाकेदार फलंदाजीने डावाची सुरुवात केली. साई सुदर्शनने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीच्या षटकावर खेळताना त्याने सलग पाच चौकार मारले. सामन्यात साई सुदर्शन खूप चांगली फलंदाजी करत होता. पण त्याला झीशान अन्सारीनं बाद केलं. त्याने सामन्यात २३ चेंडूत ४८ धावा केल्या.

गुजरात टायटन्स संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि त्याचे १२ गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट अधिक ०.७४८ आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये ९ व्या स्थानावर आहे. संघाला चालू हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला योग्य संघ संयोजन करताना दिसत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com