Sports

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

RCB vs GT IPL 2026 Qualifier 1: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना धरमशाला येथे खेळला गेला. यात आरसीबीने गुजरातच्या संघाचा दारूण पराभव केला.

Bharat Jadhav

  • आरसीबीने गुजरात टायटन्सवर ९२ धावांनी मोठा विजय मिळवला.

  • धरमशालामध्ये खेळलेल्या सामन्यात आरसीबीने २५५ धावांचे लक्ष्य दिले.

  • गुजरातचा संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीचं तिकीट कन्फर्म केलंय. गतविजेत्या आरसीबीने मंगळवारी गुजरात टायटन्सला (जीटी) ९२ धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आरसीबीने धरमशाला मैदानावर २५५ धावांचे ऐतिहासिक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, गुजरातचा संघ १९.३ षटकांत १६२ धावांवर सर्वबाद झाला.

गजविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने क्वालिफायर सामन्यात शानदार खेळी करत गुजरातचा पराभव केला. आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूच्या संघाने २० षटकांत २५४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची फलंदाजी पूर्णपणे फोल ठरली. गुजरातचा संघ १६२ धावांवरच गारद झाला. यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची पहिली संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आणि आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

मागील हंगामात या संघाने अंतिम सामना जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती,आता दुसऱ्यांदा विजेता कप मिळवण्याची संधी आरसीबीकडे आहे. गेल्या हंगामात आरसीबीने पंजाबला हरवून पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता.

गुजरात टायटन्सचा संघ ऑलआऊट

गुजरातची फलंदाजी पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली. २५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. साई सुदर्शन १४ धावांवर चितपट झाला तर कर्णधार शुभमन गिल केवळ २ धावांवर त्रिफळाचीत झाला. यष्टीरक्षक जोस बटलरने ११ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. निशांत सिंधू ५ धावांवर, तर वॉशिंग्टन सुंदर ८ धावांवर बाद झाला.

जेसन होल्डरला आपले खातेही उघडता आले नाही. राहुल तेवतियाने अर्धशतक झळकावून गुजरातच्या आशा पल्लवित केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. क्वालिफायर सामन्यात आरसीबीकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जेकब डफीने सर्वाधिक ३ बळी घेतले. रसिक सलाम दारने २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनेही २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

काळे की पिवळे, आरोग्यासाठी कोणते खजूर सर्वात बेस्ट?

Shivsena UBT : ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार; १४-१६ आमदारही पक्ष सोडणार? आमदारानं नेमकं टायमिंग सांगितलं

RBI New Rule: आरबीयने बँकेच्या नियमात केला मोठा बदल; ग्राहकांच्या परवानगीशिवाय नाही देणार कोणत्याही योजनांची ऑफर

Apoorva Mukhija: 'दुबईच्या शेखने १५ कोटी दिले, तर त्याच्यासोबत...'; रिबेल किड अपूर्वा मुखीजाच्या वक्तव्यावरून नवा वाद

SCROLL FOR NEXT