RCB Playoffs qualification scenario after srh vs gt match ipl 2024 amd2000 twitter
Sports

RCB Playoffs Scenario: CSK ला फक्त हरवून चालणार नाही! RCB ला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

IPL 2024 Playoffs Scenario: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हा सामना रद्द झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने येणार होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार असं वाटलं होतं. मात्र गेल्या सामन्याप्रमाणे हा सामनाही रद्द झाला. यापूर्वी गुजरात आणि कोलकाता नाईट रायडर्स सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

हा सामना रद्द झाल्याचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला होता. दरम्यान हा सामना रद्द झाल्याचा फायदा सनरायझर्स हैदराबादला झाला आहे. हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. आता प्लेऑफमध्ये जाणारे ३ संघ ठरले असून शेवटच्या एका स्थानासाठी २ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाने १३ सामन्यांमध्ये १९ गुणांसह प्लेऑफ गाठलं आहे. पुढचा सामना जिंकून कोलकाताचा संघ २१ गुणांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हा संघ अव्वल स्थानी राहणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे १६ गुण आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे १५ गुण आहेत. हे तिन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

चौथ्या स्थानासाठी दोन संघांमध्ये लढत

प्लेऑफमध्ये जाणारे ३ संघ ठरले असून चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. चेन्नईचा १ सामना शिल्लक असून या संघाचे १४ गुण आहेत. चेन्नईला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर हा सामना फक्त जिंकायचा आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी फक्त विजय मिळवून चालणार नाही.

या संघासाठी प्लेऑफचं समीकरण ठरलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला जर प्लेऑफमध्ये जायचं असेल तर हा सामना १८ षटकात जिंकावा लागणार आहे. तर गोलंदाजी करत असताना हा सामना कमीत कमी १८ धावांनी जिंकावा लागणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT