Saam tv Saam tv
Sports

Star Cricketer : स्टार क्रिकेटपटूला अत्याचार प्रकरणात अटक होणार; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Star Cricketer News : स्टार क्रिकेटपटू यश दयाल पुन्हा अडचणीत सापडला आहे. अत्याचार प्रकरणात यश दयालला अटक होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा जलद गोलंदाज पुन्हा वादात

यश दयाल असे क्रिकेटपटूचे नाव

जयपूर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात यश अडचणीत

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा जलद गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. जयपूरमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात यश दयाल आणखी गोत्यात सापडला आहे. याच प्रकरणात अटकेपासून कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे यशच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

यश दयालवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. जयपूरमधील अल्पयवीन तरुणीने यशवर गंभीर आरोप केलाय. क्रिकेट करिअरमध्ये मदत करण्याचं आश्वासन देऊन दोन वर्ष लैंगिक शोषण केल्याचा यशवर आरोप आहे. पीडित तरुणी १७ वर्षांची असताना तिच्यावर अत्याचार झाला.

पोलिसांत गुन्हा नोंदवल्यानंतर यशने अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. वकिलाने दावा केला की, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्येही अशाच प्रकरणाची नोंद झाली होती. त्यात अलाहाबाद हायकोर्टाने आरोपीला अटकेपासून दिलासा दिला. परंतु जयपूर प्रकरणात कोर्टाने कठोर निर्णय दिला.

कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले आहेत की, 'पुढील सुनवाणीदरम्यान या प्रकरणाची डायरी सादर करावी. या प्रकरणाची २२ ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा सुनावणी होणार आहे. याचदरम्यान यश दयालला अटक होण्याची शक्यता आहे. यश दयालवर एका महिन्यात दुसरा लैंगिक शोषणाचा आरोप आहे. याआधी ८ जुलै रोजी उत्तर प्रदेशातील एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन ५ वर्ष शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. परंतु या प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला.

यशच्या वकिलांचं म्हणणं आहे की, 'हा प्रकार संपूर्ण षडयंत्र आहे. एक टोळी सेलिब्रिटी आणि खेळाडूंना लक्ष्य करत आहे. ब्लॅकमेल करून खोटा गुन्हा नोंदवण्यात येत असल्याचा वकिलाचा दावा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suralichi Vadi Recipe : वाटीभर बेसनापासून बनवा सुरळीच्या वड्या, पुदिन्याच्या चटणीसोबत घ्या आस्वाद

Maharashtra Live News Update: वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडमध्ये, कारवाईचे दिले आदेश

Shivali Parab : 'पिया तू अब तो आजा...' गाण्यावर थिरकली शिवाली परब; जिंकली चाहत्यांची मने, पाहा VIDEO

Pune Khadkwasla : खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी; १ ते ९ ऑगस्टदरम्यान पाणीसाठ्यात केवळ किरकोळ वाढ

Ladki Bahin Yojana: अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT