Royal Challengers Bengaluru Captain X (Twitter)
Sports

RCB New Captain : विराट कोहलीचा पत्ता कट, फाफ ड्यु प्लेसिसनंतर 'हा' खेळाडू बनणार आरसीबीचा नवा कॅप्टन

Royal Challengers Bengaluru : आरसीबीने लिलावामध्ये फाफ ड्यु प्लेसिस रिलीज केले होते. मागच्या सीझनमध्ये तो आरसीबीचा कॅप्टन होता. त्याच्यानंतर कॅप्टन कोण असेल याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

Yash Shirke

RCB Captain : आयपीएल २०२५ ला लवकरच सुरुवात होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडियन प्रीमियर लीगचा नवा सीझन सुरु होईल असे म्हटले जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक टीम्स नव्या कॅप्टन्स मैदानामध्ये उतरणार आहेत. या टीम्समध्ये आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा देखील समावेश होतो. फाफ ड्यु प्लेसिसला रिलीज केल्याने आरसीबीचा नवा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएलच्या लिलावामध्ये आरसीबीने फाफ ड्यु प्लेसिससह अनेक खेळाडूंना रिलीज केले. मागच्या सीझनमध्ये तो आरसीबीचा कॅप्टन होता. तेव्हा तो गेल्यानंतर आरसीबीचा कॅप्टन कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कॅप्टन बनू शकतो असे म्हटले जात होते. मिळालेल्या अहवालानुसार, रजत पाटीदारकडे नव्या सीझनमध्ये आरसीबीकडे कॅप्टनशिपची धुरा दिली जाणार आहे. पण अजूनही टीम मॅनेजमेंटकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

रजत पाटीदारने सैय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये चांगला खेळ केला. तो मध्य प्रदेश टीमचा कॅप्टन होता. चांगले नेतृत्त्व करत त्याने टीमला फायनलपर्यंत पोहोचवले. रजतने ९ इनिंग्समध्ये ४२८ धावा केला. त्याचा स्टाईक रेट १८६.०८ इतका होता. तीन अर्धशतक करत तो सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सर्वात जास्त रन्स करणारा दुसरा बॅट्समन बनला. त्याच्या या कामगिरीमुळे येत्या सीझनमध्ये तो आरसीबीचा कॅप्टन बनू शकतो असे म्हटले जात आहे. कॅप्टनशिपसाठी त्याला रिटेन करण्यात आले आहे असेही लोक म्हणत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची २०२५ मधील टीम -

विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लायम लिव्हिंगस्टो, फिल साल्ट, जितेश शर्मा, जॉश हेजलवुड, रसिख सलाम डार, सुयश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंह, टीम डेविड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी नगिडी, अभिनंदन सिंग आणि मोहित राठी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : हायवेवर अर्ध्या रात्री थरार! जे कुणासोबतही कधीच घडू नये ते व्यापाऱ्यासोबत घडलं....

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला फाशी द्या, बीडच्या परळीत सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

Badlapur Hidden Gem: घनदाट वनराई, निसर्गाची उधळण; वन डे पिकनिकसाठी बदलापूरमधील या सीक्रेट ठिकाणांना द्या भेट

चैनी खैनीनं घेतला जीव! तंबाखू थुंकायला गेलेल्या व्यक्तीला वंदे भारत ट्रेननं उडवलं

SCROLL FOR NEXT