ravindra jadeja  saam tv news
Sports

Ravindra Jadeja: टीम इंडियासाठी गुड न्यूज! या दिवशी जडेजा परतणार मैदानात

Ravindra Jadeja Injury Update: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेचाच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Injury Update:

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत तो खेळताना दिसून येणार नाही. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही मोलाचं योगदान दिलं होतं. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.

रविंद्र जडेजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो धावताना दिसून येत आहे. तसेच फिटनेस वर्कआऊट करताना दिसून येत आहे.

ही पोस्ट आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. तसेच क्रिकेट चाहते सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. कारण जेव्हा तो बाहेर झाला त्यावेळी म्हटलं जात होतं की, तो दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो. मात्र आता त्याचे कमबॅक करण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. (Cricket news in marathi)

हैदराबाद कसोटीत त्याने दमदार खेळ केला होता. त्याने फलंदाजी करताना ८९ धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना ५ महत्वपूर्ण गडी बाद केले होते. या सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी करून दाखवली होती. मात्र तरीदेखील भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला.

भारताचा पराभव..

या सामन्यात भारतीय संघ आघाडीवर होता. मात्र तिसऱ्या दिवशी सामना इंग्लंडच्या दिशेने झुकला. भारतीय संघाने इंग्लंडवर १९० धावांची आघाडी घेतली होती. मात्र ओली पोपने १९६ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४०० पार पोहचवली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या होत्या. मात्र संपूर्ण डाव २०२ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT