Ravindra Jadeja given out on Obstructing The Field Rule Know What exactly rule is all about twitter
Sports

Ravindra Jadeja Runout: जडेजा खरंच आऊट होता का? काय सांगतो 'ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड' चा नियम?

Obstructing The Field Rule Explaination: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाला ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद केलं गेलं आहे. काय सांगतो नियम? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६१ व्या सामन्यात रविंद्र जडेजा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रविंद्र जडेजाची एक चूक संघाला महागात पडू शकली असती. तो या सामन्यातील १६ व्या षटकात धावबाद होऊन माघारी परतला.

तर झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट मारला. नॉन स्ट्राइकला असलेल्या ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजाला ताळमेळ साधता आला नाही. त्यामुळे जडेजाच्या अडचणीत वाढ झाली.

जडेजाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋतुराज गायकवाडने त्याला माघारी जायला सांगितलं. त्यावेळी संजू सॅमसनने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजा हा खेळपट्टीच्या मधून धावत होता. त्यावेळी संजू सॅमसनचा चेंडू जडेजाच्या पाठीला जाऊन लागला.

खेळपट्टीच्या मधून धावत असल्याने अंपायरने त्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड म्हणून बाद घोषित केलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी रविंद्र जडेजाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दरम्यान काहींचं म्हणणं आहे की, जडेजाने मुद्दाम केलं आहे. तो नेहमी आपली विकेट वाचवण्यासाठी असं करतो. त्यामुळे संजू सॅमसनने जे केलं ते अतिशय योग्य आहे.

काय सांगतो नियम? (Obstructing The Field Rule Explained)

ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड म्हणजे फलंदाजाने चेंडू खेळून झाल्यानंतर तो मुद्दामहून विरोधी संघातील खेळाडूंच्या कामात अडथळा निर्माण करत असेल किंवा आपल्या कृतीने क्षेश्ररक्षण करत असलेल्या संघातील खेळाडूंचं लक्ष विचलित करत असेल, तर फलंदाजाला ऑब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद घोषित केलं जातं. या नियमात अपवाद म्हणजे फलंदाज स्वत:चा बचाव करण्यासाठी बॅटचा वापर करत असेल तर तो बाद घोषित केला जात नाही. याशिवाय धाव घेत असताना फलंदाज दुखापतग्रस्त झाला आणि चुकून त्याच्यामुळे विरोधी संघातील खेळाडूंना क्षेत्ररक्षण करताना अडथळा निर्माण झाला, तरीदेखील त्याला बाद घोषित केलं जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT