ravindra jadeja saam tv news
Sports

IND vs ENG: जडेजा बनला टीम इंडियाचा संकटमोचक! अर्धशतक झळकावताच केलं हटके सेलिब्रेशन - VIDEO

Ravindra Jadeja Celebration: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने अर्धशतक झळकावताच हटके सेलिब्रेशन केलं आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Celebration:

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने हैदराबाद कसोटीत दमदार खेळ करत अर्धशतक झळकावलं आहे. एकीकडे विकेट्स जात असताना रविंद्र जडेजाने डाव सावरला आणि संघाची धावसंख्यात ३०० च्या पार पोहचवली.

भारत आणि हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे.

रविंद्र जडेजा या सामन्यात सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. आतापर्यंत त्याने १२९ चेंडूंचा सामना करत ६९ धावांची खेळी केली आहे. त्याने आपल्या या खेळीदरम्यान ६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

जडेजाने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हटके सेलिब्रेशने देखील केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याने नेहमीप्रमाणे बॅट तलवारसारखी फिरवत आपल्या अर्धशतकाचं सेलिब्रेशन केलं.

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने मोठी आघाडी घेतली आहे. संघाचा डाव डगमगत असताना रविंद्र जडेजाने केएल राहुल आणि केएस भरतसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. या डावात सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने ७४ चेंडूंचा सामना करत ८० धावांची खेळी केली. तर केएल राहुलने १२३ चेंडूंचा सामना करत ८६ धावांची खेळी केली. (Cricket News In Marathi)

इंग्लंडने केल्या २४६ धावा..

इंग्लंडचा बॅझबॉल या डावात कामी आला नाही. कारण इंग्लंडला या डावात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची तुफानी खेळी केली. तर बेन डकेटने ३५, जॉनी बेअरस्टोने ३७, जो रुटने २९ धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर संपुष्टात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT