मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं. पदार्पणाच्या सामन्यात त्याने सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली. मात्र खातं उघडल्यानंतर त्याने गियर टाकत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अवघ्या काही चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केलं. परंतु रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे त्याला धावबाद व्हावे लागले.(Latest News)
रविंद्र जडेजाच्या या चुकीच्या कॉलमुळे सरफराजला आपली विकेट द्यावी लागली. सेट झाल्यानंतर सरफराज खान चौफेर फटकेबाजी करत होता. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याची शतकी खेळीची वाटचाल सुरु होती. त्याची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की, तो पदार्पणात आपलं शतक पूर्ण करेल. मात्र ६२ धावांवर फलंदाजी करत असताना जडेजाच्या चुकीमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. दरम्यान रविंद्र जडेजाने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी नाबाद शतक ठोकलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पण त्यांच्या मनात त्याने केलेली चूक बोचत होती. सफराज बाद झाल्यानंतर रोहित शर्मा देखील नाराज झाला होता. जडेजाला देखील त्यांची चुकी मान्य झाली. आपल्या चुकीच्या कॉलमुळे सरफराजला बाद व्हावं लागलं हे त्यांच्या मनाला बोचत होतं. आजच्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर रविंद्र जडेजाने चुकीच्या कबुलीचे स्टेटस ठेवले आहे. आपला कॉल चुकीचा होता असं म्हणत त्यांनी सरफराजची माफी मागितलीय.
दरम्यान संथ गतीनं फलंदाजी करणारा रविंद्र जडेजा आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. त्याला शतक पूर्ण करण्यासाठी एक धावेची गरज होती. नॉन स्टाईकला असलेला सरफराज देखील आपल्या पार्टनरच्या शतकासाठी जीव तोडून पळण्याच्या तयारीत होती. जडेजाने चोरटी धाव घेण्यासाठी चेंडू मिडऑनला पुश केला अन् सरफराजला धाव घेण्याचा इशारा केला.
सरफराजलादेखील धाव घेण्यासाठी धावला, मात्र जडेजा मधेच थांबत त्याला परत पाठवले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सरफराज आपल्या नॉन स्ट्राइकवर पोहोचे पर्यंत मार्क वूडने डाव साधत हिट थ्रो केला आणि सरफराजला बाद केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.