ms dhoni and ravindra jadeja fight
ms dhoni and ravindra jadeja fight  twitter
क्रीडा | IPL

MS Dhoni Ravindra Jadeja Fight: लाईव्ह सामन्यात धोनी अन् जडेजा आले आमने- सामने; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ankush Dhavre

IPL 2023: चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला धूळ चारत चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२३ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

आता हा संघ क्वालिफायरच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघासोबत दोन हात करणार आहे. या सामन्यापूर्वी रवींद्र जडेजा आणि एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरु आहे. ज्यात रवींद्र जडेजा नाराज असल्याचे दिसून येत आहे. ही घटना २० मे रोजी घडली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामना झाल्यानंतर ज्यावेळी खेळाडू मैदानाबाहेर जात होते.

त्यावेळी हे दोघे एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले होते. या व्हिडिओवरून असं दिसून येत आहे की, रवींद्र जडेजाला कुठल्यातरी गोष्टीचा राग आला आहे. तर एमएस धोनी त्याची समजूत काढताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर धोनी जडेजाच्या खांद्यावर हात ठेवताना दिसून येत आहे.

रवींद्र जडेजाच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने गोलंदाजी करताना ४ षटकात ५० धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला होता.

फलंदाजीत तो चमकला होता. त्याने ७ चेंडूंचा सामना करत ७ चेंडूंमध्ये २० धावा ठोकल्या होत्या. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटक अखेर २२३ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

नेतृत्व करताना ठरला होता फ्लॉप..

एमएस धोनी नंतर संघाचा कर्णधार कोण? असा प्रश्न पडला असताना रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्याला ही जबाबदारी पार पाडता आली नव्हती . ८ सामन्यांपैकी चेन्नईने केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता.

ही कामगिरी पाहता पुन्हा एकदा एमएस धोनीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला होता.

प्लेऑफमध्ये चेन्नईचा दबदबा..

चेन्नईचा संघ हा मुंबई इंडियन्स नंतर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने १४ पैकी १२ वेळेस प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

तसेच आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १४ पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. एक सामना हा प्रवासामुळे रद्द केला गेला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

SCROLL FOR NEXT