WTC Final 2023: मिशन WTC Final! आज किंग कोहलीसह 'हे' प्रमुख खेळाडू होणार इंग्लंडला रवाना

Team India Will Go For WTC Final: यात विराट कोहलीसह काही प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.
team india
team indiasaam tv

Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. येत्या ७ जून ते ११ जून दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू ३ गटांमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहेत. आयपीएल २०२३ स्पर्धेतील पराभूत झालेल्या संघातील खेळाडू आज इंग्लंडला रवाना होणार आहेत. यात विराट कोहलीसह काही प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.

team india
Why RCB Fails In IPL?: RCB चं नेमकं गंडतंय तरी कुठं? १६ वर्षे,अर्धा डझन कर्णधार बदलूनही IPL ची ट्रॉफी नाही! ३ प्रमुख कारणे

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पहिल्या गटासह इंग्लंडला रवाना होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या पराभवानंतर आता विराट कोहली देखील इंग्लंडला जाणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील विराट कोहलीसह इंग्लंडला रवाना होणार आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, भारतीय संघ २-३ गटांमध्ये इंग्लंडला जाणार आहे. प्रमुख खेळाडू म्हणून आर अश्विन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि उमेश यादव यांचा समावेश असणार आहे.

team india
Virat Kohli Record: विराट म्हणजे १०१ नंबरी सोनं! शतकी खेळी करत मोडला IPL स्पर्धेतील सर्वात मोठा रेकॉर्ड

जयदेव उनाकडट देखील जाणार इंग्लंडला..

जयदेव उनाकडट हा आयपीएल स्पर्धेत नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तो आज पहिल्या गटासह इंग्लंडची फ्लाईट पकडणार आहे.

तो अजूनही पूर्णपणे फिट झाला नसून बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने इन्साईडस्पोर्ट्सला दिलेल्या माहितीत म्हटले की, जयदेव उनाकडट इंग्लंडला रवाना होणार आहे.

त्याची पुनर्वसन प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आली आहे. मात्र तो सामन्यासाठी अजूनही फिट झाला नाहीये. मात्र येणाऱ्या आठवड्यात तो पूर्णपणे फिट होऊ शकतो. (Latest sports updates)

team india
Virat Kohli Injury: WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! संघातील सर्वात अनुभवी फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे संघ:

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com