Virat Kohli Injury: WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! संघातील सर्वात अनुभवी फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

WTC 2023: या सामन्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
team india
team india saam tv

WTC Final 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात झाली असून, येत्या २८ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चारही संघांमध्ये आता जेतेपदासाठी लढत पाहायला मिळणार आहे.

ही स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

team india
IPL 2023 Playoffs Schedule: प्लेऑफचे ४ संघ ठरले! कधी आणि कुठे रंगणार सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने एकाकी झुंज देत १०१ धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

विराट कोहली दुखापतग्रस्त..

विराट कोहली हा उत्तम क्षेत्ररक्षक देखील आहे. क्षेत्ररक्षण करत असताना तो संघासाठी जीव ओतून क्षेत्ररक्षण करत असतो. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.

मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी विजय कुमार गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विजय शंकर फलंदाजी करत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर शॉट मारला.

त्यावेळी विराटने चपळाई दाखवत झेल टिपला. मात्र हा झेल टिपताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या कारणामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर तो मैदानात आलाच नाही . (Latest sports updates)

भारतीय संघाच्या चिंतेत वाढ...

हा सामना झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक संजय बांगरने सांगितले की, त्याच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचं संजय बांगर यांनी सांगितलं आहे. ४ दिवसात त्याने २ शतके झळकावली आहेत.

तो असा खेळाडू आहे झाला फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही तितकंच योगदान द्यायचं आहे, मात्र विराट कोहलीची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवू शकते. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

या सामन्यात विराट कोहली संघातील प्रमुख फलंदाज असणार आहे. जर तो बाहेर झाला तर नक्कीच भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com