cheteshwar pujara ravindra jadeja twitter
Sports

IND vs ENG Test Series: राजकोट कसोटीपूर्वी रविंद्र जडेजा अन् चेतेश्वर पुजाराचा विशेष सन्मान, कारण...

Ravindra Jadeja- Cheteshwar Pujara: राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यापूर्वी रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Ravindra Jadeja- Cheteshwar Pujara:

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारतीय संघावर २८ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत इंग्लंडवर २८ धावांनी विजय मिळवला. दरम्यान ही मालिका १-१ च्या बरोबरीत असून मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यापूर्वी रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजाराचा सन्मान करण्यात आला. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतात. आता या दोघांचाच सन्मान का केला गेला? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. चेतेश्वर पुजारा जेव्हा जेव्हा संघाबाहेर असतो तेव्हा तो सौराष्ट्र संघाकडून खेळतो. तर रविंद्र जडेजानेही सौराष्ट्र क्रिकेटला पुढे नेण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. या दोन्ही स्टार खेळाडूंनी अंडर -१४ पासून सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Cricket news in marathi)

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चेतेश्वर पुजारा म्हणाला की, ' मला अजूनही आठवतं जेव्हा मी हा खेळ शिकायला सुरुवात केली. हे माझं होम टाऊन आहे. जेव्हा मी अंडर १४ स्तरावर खेळत होतो त्यावेळी मी आणि रविंद्र जडेजा एकत्रच होतो. ज्यावेळी माझी अंडर १४ संघात निवड झाली त्यावेळी मला दुःखही झालं होतं. कारण मी माझ्या कुटुंबाला सोडून दूर जात होतं मी लहान होतो आणि मला कुटुंबापासून दूर जायचं नव्हतं. इथूनच सुरू झाला माझा प्रवास.'

तसेच रविंद्र जडेजा म्हणाला की, ' मला वाटतंय की आपण अंडर १४ स्पर्धेत एकत्र खेळलो होतो. जर मी चुकत नसेल तर ती स्पर्धा आपण पुण्यात खेळलो होतो. मला माहितेय पुजाराला सर्व लक्षात आहे. मी रणजी ट्रॉफी स्पर्धेत रेल्वेविरुध्द खेळताना तिहेरी शतक झळकावलं होतं. ही एक फलंदाज म्हणून माझी चांगली आठवण आहे. तर याच मैदानावर मी अनेकदा ५ विकेट्स घेतल्या आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT