Cricket : विश्वचषकानंतर रवी शास्त्री प्रशिक्षक पद सोडणार?; हे तीन दिग्गज शर्यतीत Twitter
Sports

Cricket : विश्वचषकानंतर रवी शास्त्री प्रशिक्षक पद सोडणार? हे तीन दिग्गज शर्यतीत

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांचे पद सोडावे लागणार हे निश्चित आहे परंतु बीसीसीआयकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीम इंडिया 17 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषक खेळणार आहे. भारतीय संघाकडून या स्पर्धेतून मोठ्या आशा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे त्याला मोठी संधी आहे. स्पर्धेनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की जर कोहली विश्वचषक जिंकला नाही, तर त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले जाईल, परंतु या प्रकरणात कितपत सत्य आहे हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांचे पद सोडावे लागणार हे निश्चित आहे परंतु बीसीसीआयकडून अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे देखील पहा :

रवी शास्त्रींचं पद सोडणं निश्चित?

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -20 विश्वचषकानंतरच संपत आहे. Inside sportsनुसार, रवी शास्त्री यांनी स्वतः कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. मात्र, बीसीसीआय आणि शास्त्री यांच्यात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राहुल द्रविड पुढील प्रशिक्षक होणार?

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) क्रिकेट प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर तो आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेईल या चर्चांना ब्रेक लागला आहे. आता हे अगदी स्पष्ट आहे की द्रविड भारताचा पुढील प्रशिक्षक बनू शकणार नाही.

हे दिग्गज शास्त्रींची जागा घेऊ शकतात

एकीकडे राहुल द्रविड यापुढे टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकणार नाही, तर इतर अनेक दिग्गजांसाठी भारताचा प्रशिक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये तीन नावं चर्चेत आहेत. ते म्हणजे माईक हेसन, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी यांच्या नावाचा बीसीसीआय विचार करू शकतं, परंतु कोण प्रशिक्षक बनतो हे येणारा काळच सांगेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT