ravi bishnoi catch twitter
Sports

Ravi Bishnoi Catch: रवी बिष्णोई बनला सुपरमॅन! हवेत झेपावत घेतला जॉन्टी रोड्स स्टाईल कॅच, पाहा VIDEO

IND vs ZIM, 3rd T20I: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज रवी बिष्णोईने हवेत उडी मारत शानदार झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने २३ धावांनी विजय मिळवला आहे. फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा रवी बिष्णोई आपल्या शानदार झेलमुळे चर्चेत आला आहे. त्याने पॉईंटला क्षेत्ररक्षण करताना अविश्वसनीय झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १८२ धावा केल्या. झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी भारतीय संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या ब्रायन बेनेटने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने शॉट मारला. फलंदाजाने शॉट जोरदार मारला होता. मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवी बिष्णोईने सुपरमॅन स्टाईल उडी मारली आणि भन्नाट झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यासह अवघ्या चौथ्या षटकात झिम्बाब्वेला तिसरा धक्का बसला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १८२ धावा केल्या. भारतीय संघाला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात कर्णधार शुभमन गिलने मोलाची भूमिका बजावली. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने ३६ धावांची खेळी करत शानदार सुरुवात करून दिली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या ३६ धावांवर झिम्बाब्वेचे ५ फलंदाज माघारी परतलेले होते. शेवटी झिम्बाब्वेला १५९ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने या सामन्यात २३ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या सामनय्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कमबॅक केलं आणि एकतर्फी विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT