Ravi Bishnoi: सुपर ओव्हरमध्ये बॉलिंग करताना काय प्लान होता? बिश्नोईनं रणनीती सांगतानाही गुगली टाकला

Ravi Bishnoi On Super Over: दरम्यान भारतीय संघाकडून सुपर ओव्हर टाकणाऱ्या रवी बिश्नोईने आपल्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे.
Ravi  bishnoi
Ravi bishnoitwitter
Published On

India vs Afghanistan 3rd T20I:

आधी टाय, सुपर ओव्हर आणि मग पुन्हा एकदा सुपर ओव्हर. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात क्रिकेट चाहत्यांना ॲक्शन पॅक क्रिकेट पाहायला मिळालं आहे.

मालिकेतील तिसरा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने डबल सुपर ओव्हरमध्ये दमदार खेळ करत विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून सुपर ओव्हर टाकणाऱ्या रवी बिश्नोईने आपल्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे.

सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाचा विजय..

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित धर्माच्या शतकी खेळीच्या आणि रिंकू सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावांची गरज होती. मात्र अफगाणिस्तानलाही २१२ धावा करता आल्या.

Ravi  bishnoi
IND Vs AFG: १४ वर्षानंतर विराट कोहलीसोबत पहिल्यांदा असं घडलं? स्वतः कोहलीसह प्रेक्षकही हैरान

सुपर ओव्हर टाय..

सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. अफगाणिस्तानची सलामी जोडी मैदानावर उतरली. दोघांनी मिळून १७ धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची धावसंख्या बरोबरीत सुटली. त्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारतीय संघाने ११ धावा केल्या होत्या. तर धावांचा बचाव करण्यासाठी रवी बिष्णोई गोलंदाजीला आला होता. त्याने या धावांचा यशस्वीरीत्या बचाव केला आणि संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

Ravi  bishnoi
Virat Kohli: अद्भुत, अविश्वसनीय! बाऊंड्री लाईनवर डाईव्ह मारत उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण ; video पाहायलाच हवा

काय होता प्लान ?

अटीतटीच्या लढतीत ११ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी रोहितने रवी बिष्णोईकडे सोपवली. त्याने ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडत केवळ १ धाव खर्च केली आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामन्यानंतरच्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ' मला स्टंप लाईनवर गोलंदाजी करायची होती. मी अंतिम षटकात तेच केलं. माझा बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. मी तेच केलं आणि मला यश मिळालं. '

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com