rashid khan  saam tv
Sports

Rashid Khan Record: सूर्याचं शतक Rashid ने फिकं पाडलं! दिग्गजांना मागे सोडत IPL स्पर्धेत रचला इतिहास

Rashid Khan Batting: गुजरातकडून वन मॅन शो बॅटिंग करणाऱ्या राशिद खानने सर्वांचे मन जिंकले आहे.

Ankush Dhavre

MI VS GT IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी करत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंचा सामना करत नाबाद १०३ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने ५ गडी बाद २१८ धावांचा डोंगर उभारला होता. धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला अवघ्या ८ गडी बाद १९१ धावा करता आल्या.

हा सामना जरी मुंबईने जिंकला असला तरी गुजरातकडून वन मॅन शो बॅटिंग करणाऱ्या राशिद खानने सर्वांचे मन जिंकले आहे.

राशिद खानचा मोठा रेकॉर्ड..

राशिद खानने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना ३० धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. तर धावांचा पाठलाग करताना देखील त्याने मोलाचं योगदान दिलं. गुजरात टायटन्स संघाकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १० षटकार मारले. या खेळीसह त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत पॅट कमिन्सचा आयपीएल स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. (Latest sports updates)

आयपीएल स्पर्धेत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज...

७९* राशिद खान (२०२३)

६७* पॅट कमिन्स (२०२१)

६४ हरभजन सिंग (२०१५)

५२* ख्रिस मॉरिस (२०१७)

राशिदची खेळी व्यर्थ...

मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध राशिद खानने केलेली खेळी व्यर्थ गेली आहे. कारण गुजरात टायटन्स संघाला हा सामना २७ धावांनी गमवावा लागला आहे. हा सामना जिंकून गुजरातला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. मात्र ती संधी आता हुकली आहे. मुंबईच्या विजयानंतर आता प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक झाली आहे.

आता ३ संघांमध्ये पहिल्या स्थानी जाण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत ५७ सामने होऊन गेले आहेत. अजुनपर्यंत एकाही संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाहीये. आयपीएल स्पर्धेत असं काही घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुजरातचा संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर मुंबई आणि चेन्नईकडे आता गुजरातला पहिल्या स्थानावर हटवण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

Coolie Advance Booking Collection: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; पहिल्या दिवशी करणार इतक्या कोटींच कलेक्शन

SCROLL FOR NEXT