Rashid Khan record in IPL x ipl
Sports

Rashid Khan: गुजरात टायटन्सची'शान'राशीद खान; IPLच्या इतिहासात रचला इतिहास, मोडला ५ दिग्गजांचा विक्रम

Rashid Khan IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. या सामन्यात राशीद खानने कमाल केली. राशीद खानने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना त्याने १ विकेट घेतली तर दुसरीकडे फलंदाजी करताना ११ चेंडूवर २४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातला जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Bharat Jadhav

Rashid Khan record in IPL :

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. या सामन्यात राशीद खानने कमाल केली. राशीद खानने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना त्याने १ विकेट घेतली तर फलंदाजी करताना ११ चेंडूवर २४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातला जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.(Latest News)

राशीदच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. राशीदने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकून आयपीएलमध्ये इतिहास रचलाय. आयपीएलच्या इतिहासात २५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा राशीद खान पहिला खेळाडू बनलाय. राशीदने १२ व्या आयपीएलमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा पराक्रम करून राशीदने एकाच वेळी अनेक दिग्गजांना धोबीपछाड दिलाय. सामनावीराचा पुरस्कार मिळण्याच्या विक्रमात गिलने आयपीएलमध्ये ९ वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. तर ऋतुराज गायकवाडने ८ वेळा, रोहित शर्माने ७ वेळा आणि रहाणेने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. २५ किंवा त्यापेक्षा कमी वयात ७ वेळा ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावण्यात यशस्वी ठरला होता.

या प्रकरणात संजू सॅमसनला आयपीएलमध्ये ७ वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेत. सध्या राशीदचे वय २५ वर्षे आणि गिलचे वय २४ वर्षे आहे. यामुळे गिलला राशिदचा हा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

२५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात IPL मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारे क्रिकेटर

  • १२- राशिद खान

  • ९-शुबमन गिल

  • ८- ऋतुराज गायकवाड

  • ७ - रोहित शर्मा

  • ७- अजिंक्य रहाणे

  • ७- संजू सॅमसन

बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने २० षटकात ३ विकेट गमावत १९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर गुजरातने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून सर्वांना धक्का देत राजस्थानला पहिल्या पराभवाची चव चाखायला लावली.

शेवटच्या चेंडूवर गुजरातचा यशस्वी पाठलाग

  • १९७ धावा राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूर २०२४

  • १९६ धावा हैदराबाद विरुद्ध वानखेडे, २०२२

  • १९० धावा पंजाब किंग्सविरुद्ध ब्रेबॉर्न २०२२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

Shruti Marathe: मोकळे केस अन् गालावरची गोंडस खळी...

SCROLL FOR NEXT