मेघालयचा युवा फलंदाज आकाश कुमार चौधरीने ११ चेंडूत अर्धशतक झळकावलं
त्याने तब्बल ८ षटकार ठोकले, त्याची फलंदाजी पाहून प्रेक्षक थक्क झाले
आकाशने ठोकलं फर्स्ट क्लास क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक
रणजी ट्रॉफी २०२५-२६ राऊंड ४ चा सामना ८ नोव्हेंबर रोजीपासून खेळण्यात येत आहे. प्ले ग्रुपमध्ये मेघालय आणि अरुणाचल प्रदेशचा संघ आमनेसामने आला आहे. याच सामन्यात मेघालयच्या २५ वर्षीय आकाश कुमारने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याने ८ षटकारांच्या मदतीने ११ चेंडूत अर्धशतक ठोकलं.
पहिल्यांदा फलंदाजी करताना मेघालयने १२७ षटकात ६ गडी गमावून ६२८ धावा कुटल्या. अर्पित भाटेवारा याने २०७३ चेंडूत २०७ धावा केल्या. त्याने २३ चौकाराच्या व्यतिरिक्त ४ षटकार ठोकले. या व्यतिरिक्त अलावा किशन लिंगदोह याने देखील १८७ चेंडूत ११९ धावा केल्या. राहुल दलालने १०२ चेंडूत १४४ धावा कुटल्या. तर आकाश कुमार चौधरीने १४ चेंडूत ५० धावा करत इतिहास रचला.
आकाश कुमारने आतापर्यंत ३० फर्स्ट क्लास सामन्यात १४.३७ सरासरीने 503 धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त त्याने २८ लिस्ट ए सामन्यात १५.६१ सरासरीने २०२३ धावा केल्या आहेत. आकाशने ३० टी-२० सामन्यात १०७ धावा केल्या आहेत.
आकाशने विश्वविक्रम केला आहे. त्याने २०१२ साली एसेक्सच्या विरोधात लीसेस्टरशायरकडून खेळताना १२ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता आकाशने ११ चेंडूत अर्धशतक ठोकलं . त्याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. आकाशने १४ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या.
विश्वविक्रम कोणत्या सामन्यात झाला?
रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या चौथ्या फेरीतील मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात हा विक्रम झालाय.
आकाश कुमारनं किती चेंडूत अर्धशतक ठोकलंय?
आकाश कुमार याने अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.