shreyas iyer twitter
Sports

Ranji Trophy: IPL लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ओडिसाविरुद्ध झळकावलं शानदार द्विशतक

Shreyas Iyer Double Century: ओडिसाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार द्विशतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

Mumbai vs Odisha, Ranji Trophy: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने अखेर द्विशतकाची प्रतिक्षा संपवली आहे. ओडिसाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्यान शानदार द्विशतकी खेळी केली आहे. या सामन्यात मुंबईचा डाव गडगडला होता.

मात्र श्रेयस शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने वैयक्तिक द्विशतकी खेळी केली. तर सिद्धेश लाडसोबत मिळून विक्रमी त्रिशतकी खेळी केली. काही दिवसांपूर्वीच त्याला कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलं होतं. यासह त्याला भारतीय संघातही स्थान मिळत नव्हतं. आता त्याने आपल्या बॅटने चांगलचं उत्तर दिलं आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईला सुरुवातीला मोठे धक्के बसले. कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सिद्धेश लाडसोबत मिळून डाव सांभाळला. त्याने पहिल्या दिवशी शतक पूर्ण केलं. पहिल्या दिवशी तो १५२ धावांवर नाबाद माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने २०१ चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं.

मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात आयुष म्हात्रे १८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला भोपळाही न फोडता पॅव्हेलियनची वाट धरावी लागली. सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर अंगक्रिश रघुवंशीने ९२ धावांची शानदार खेळी केली. त्याने श्रेयससोबत मिळून १३३ धावांची भागीदारी केली.

भारतीय संघात कमबॅक करणार?

काही महिन्यांपूर्वी श्रेयस अय्यर हा भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज होता. मात्र त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर तो भारतीय संघात कमबॅक करु शकलेला नाही. इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर त्याला संघााबाहेर व्हावं लागलं होतं. श्रेयसच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०१ चेंडूंचा सामना करत २१ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने द्विशतकी खेळी साकारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT