rajat patidar twitter
Sports

IND vs ENG: तीन सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतरही पाटीदारला पाचव्या कसोटीत का संधी द्यावी? दिग्गजाने सांगितलं कारण

India vs England 5th Test: सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे.

Ankush Dhavre

AB de Villiers On Rajat Patidar:

सध्या भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत रजत पाटीदारला खेळण्याची संधी मिळाली.

मात्र त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे की, रजत पाटीदारला पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर केलं गेलं पाहिजे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला वाटतं की, रजत पाटीदारला आणखी एक संधी मिळायला हवी.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच विराट कोहलीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रजत पाटीदारसाठी भारतीय कसोटी संघाची दारं उघडली. मात्र सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याला १० घ्या सरासरीने ६२ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान ३२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. ही खेळी त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात केली होती.

रजत पाटीदारबाबत बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, ' रजत पाटीदारसाठी ही मालिका चांगली राहिलेली नाही. मात्र चांगली बाब म्हणजे भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे सामने जिंकतोय. ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलं आहे. भविष्यातील खेळाडू तयार करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे जे खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाहीये त्यांना सस्थ देण्याची गरज आहे. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळायला हवी. भारतीय संघातील वातावरण चांगलं आहे. पाटीदारला बॅकअपची गरज आहे. (Cricket news in marathi)

विराट कोहलीने माघार घेतल्यानंतर रजत पाटीदारला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. पाटीदारने आयपीएल स्पर्धेत, रणजी ट्रॉफी स्पर्धेत आणि भारतीय अ संघासाठी दमदार खेळ केला आहे. या खेळाची दखल घेत त्याला भारतीय संघात स्थान दिलं हेलन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

आता 350 रुपयांची नोट चलनात? RBI लवकरच करणार घोषणा?

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Railway Mega Block: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन दिवस पॉवर ब्लॉक; पनवेल-बेलापूर ट्रेन बंद; वेळापत्रक वाचा

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT