virat kohli X/BCCI
Sports

Virat Kohli Replacement: पुजारा नव्हे, तर गेल्या ५ दिवसात २ शतकं झळकावणाऱ्या या स्टार फलंदाजाला विराटच्या जागी संधी

Rajat Patidar: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली आहे. त्याच्या जागी स्टार फलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 1st Test:

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत - इंग्लंड कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्याच्या जागी आक्रमक फलंदाजाला संधी दिली गेली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांसाठी रजत पाटीदारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रजतने भारतीय अ संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंड लायन्सविरुद्ध २ शतकं झळकावली आहेत.

अवघ्या ५ दिवसात २ शतकं झळकावत त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला होता. अखेर त्याला संघात स्थान मिळालं आहे. आता भारत - इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत रजत पाटीदार भारतीय संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. (Cricket News In Marathi)

विराटने घेतली माघार...

विराटने वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने बीसीसीआयला विनंती केली होती. त्याची विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.

रजत पाटीदार तुफान फॉर्ममध्ये..

रजत पाटीदार सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीत १५१ धावांची तुफानी खेळी केली होती. या संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने सराव सामन्यात १११ धावांची खेळी केली. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतीय संघासोबत ठेवलं गेलं. मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT