IPL Playoff Scenario saam tv
Sports

IPL Playoff Scenario: चेन्नईनंतर आणखी एका संघाचा गाशा गुंडाळला, मुंबईने दाखवला बाहेरचा रस्ता

RR vs MI: गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थानचा १०० रन्सने पराभव केला. या विजयसह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोलची आहे. तर राजस्थान शर्यतीतून बाहेर पडली आहे

Surabhi Jayashree Jagdish

गुरुवारी आयपीएलमध्ये ५० वा सामना खेळवण्यात आला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. राजस्थानचा पराभव करत मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसरीकडे चेन्नईनंतर राजस्थान रॉयल्स देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्ण शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांच्या घातक गोलंदाजीसमोर राजस्थानचे फलंदाज टिकू शकले नाहीत. राजस्थानची संपूर्ण टीम ११७ रॅन्सच्या स्कोरवर पव्हेलियनमध्ये परतली. या पराभवासह रियान परागची टीम प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडणारी दुसरी टीम आहे. यापूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज देखील बाहेर पडली आहे.

गुरुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. यावेळी मुंबईने २० ओव्हर्समध्ये २ विकेट्स गमावून २१७ रन्स केले. या आव्हानाचा सामना करताना राजस्थानच्या टीमला १६.१ ओव्हर्समध्ये १० विकेट्स गमावून केवळ ११७ रॅन्सपर्यंत मजल मारता आली. यासोबत राजस्थानला १०० रन्सने पराभव स्विकारावा लागला.

मुंबईचा सलग सहावा विजय

राजस्थानविरूद्धचा विजय हा मुंबईचा सलग सहावा विजय होता. या विजयासह मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचली आहे. ११ सामन्यामध्ये मुंबईने ७ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात १४ पॉईंट्स आहे. यावेळी त्यांचं रनरेट 1.274 आहे. तर राजस्थानची टीन ६ पॉईंट्ससह आठव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांनी विजय

या विजयासह मुंबई इंडियन्सने एक मोठी कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सने तब्बल १३ वर्षांनी जयपूरमध्ये विजय मिळाला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला होता. त्यानंतर आता चक्क १३ वर्षांनंतर जयपूरमध्ये मुंबईचा विजय झाला. २०१२ मध्ये मुंबईचा १० विकेट्सने विजय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT