rajasthan royals twitter
Sports

IPL 2025: राजस्थान रॉयल्स संघ या ४ खेळाडूंना करू शकतो रिटेन

Rajasthan Royals, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ कोणत्या ४ खेळाडूंना रिटेन करू शकतो? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. हा लिलाव सोहळा येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित केला जाऊ शकतो. हा लिलाव सोहळा केव्हा, कुठे अन् कधी आयोजित केला जाणार अशी चर्चा सुरू असताना राजस्थान रॉयल्स संघाची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

अशी चर्चा सुरू आहे की, राजस्थान रॉयल्सचा संघ जोस बटलर आणि संजू सॅमसनला रिलीज करू शकते. मात्र ही शक्यता खूप कमी आहे. कारण हे दोघेही या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. दरम्यान राजस्थानचा संघ कोणत्या ४ खेळाडूंना रिटेन करणार? जाणून घ्या.

जोस बटलर

माध्यमातील काही वृत्तांमध्ये असा दावा केला जातोय की, जोस बटलर राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडू शकतो. जोस बटलरबद्दल बोलायचं झालं तर त्याने आयपीएल स्पर्धेत १४७.५ च्या सरासरीने ३५८२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतक आणि १८ अर्धशतक झळकावले आहेत.

संजू सॅमसन

संजू सॅमसनने आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. त्याने या संघासाठी खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, आतापर्यंत त्याने १६८ सामन्यांमध्ये ४४१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ अर्धशतक आणि २ शतक झळकावले आहेत.

यशस्वी जयस्वाल

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतक झळकावली आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातं आहे की, राजस्थान रॉयल्सचा संघ त्याला रिटेन करू शकतो. जयस्वालच्या नावे आयपीएलमध्ये ९ अर्धशतक आणि २ शतक झळकावण्याची नोंद आहे.

रियान पराग

रियान परागने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. २०१९ पासून तो याच संघासाठी खेळतोय. त्याची गेल्या हंगामातील कामगिरी पाहता हा संघ त्याला रिटेन करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT