Samit Dravid Viral Video Video Saam TV
Sports

Samit Dravid Video: द्रविडच्या मुलाची वेगवान गोलंदाजी! मुंबईविरुद्ध 2 विकेट्सही घेतल्या, रन किती दिले?

Rahul Dravid Son Viral Video: मुंबई विरुद्ध फायनलमध्ये खेळताना कर्नाटकच्या संघातून द्रविडच्या मुलाने आपल्या स्विंग आणि सीम गोलंदाजीचं कौशल्य पणाला लावलं आणि संघाला दोन विकेट्स मिळवून दिल्यात.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Dravid Son Viral Video:

टीम इंडियाचा हेड कोच असलेल्या राहुल द्रविडच्या मुलगाही सध्या क्रिकेटच्या वर्तुळात चर्चेत आहे. त्याने अंडर 19 कूच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. एकीकडे वडील जरी फलंदाजी माहीर असेल, तर द्रविडच्या मुलाने मात्र वेगवान गोलंदाजी करत दोन विकेट्सही घेतल्यात. मुंबई विरुद्ध फायनलमध्ये खेळताना कर्नाटकच्या संघातून द्रविडच्या मुलाने आपल्या स्विंग आणि सीम गोलंदाजीचं कौशल्य पणाला लावलं आणि संघाला दोन विकेट्स मिळवून दिल्यात. 19 धावा देत समित द्रविडच्या गोलंदाजीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

मुंबई विरुद्धच्या सामन्यात कर्नाटकने नाणेफेक जिंकून आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर 19 ओव्हर टाकत समितने दोन विकेट्स घेतल्या. समित द्रविडने मुंबईच्या आयुष सचिन वर्तकला 73 धावांवर रनआऊट केलं आणि प्रतिक यादवही 30 धावांवर खेळत असताना त्याला आऊट करण्याची किमया केली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

19 ओव्हरमध्ये दोन मेडनही समित द्रविडने टाकल्या. अखेर मुंबईचा संघ 380 धावांवर आटोपला. समित द्रविडने केलेल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांचंही लक्ष वेधलंय. क्रिकेट प्रेमी सध्या द्रविडच्या मुलांचं भरभरुन कौतुक करत आहेत.  (Latest Marathi News)

समितने मुंबईच्या विरुद्ध पहिल्या स्पेलमध्ये 10 ओव्हर टाकले. या 10 ओव्हरमध्ये त्याने 41 धावा दिल्या. त्यानंतर पुढच्या 9 ओव्हरमध्ये त्याने फक्त 19 रन दिले आणि दोन विकेट्सही घेतल्या. समित द्रविड गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. नुकतीच त्याने आपल्या फलंदाजीतूनही दमदार कामगिरी करुन दाखवली. जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात समित द्रविडने 98 धावांची तगडी धावसंख्या करुन दाखवली होती. त्यात 13 चौकार आणि एक षटकारही त्याने लगावला होता.

नुकताच द्रविडनेही मुलाला कोचिंग देण्याबाबतही मोठा खुलासा केला होता. मी माझ्या मुलाला क्रिकेटचे धडे देत नाही, कारण बाप असणं आणि कोच असणं, या दोन वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी निभावणं कठीण असल्याचं राहुल द्रविडने म्हटलं होतं. मी त्याचा पिता म्हणूनच खूश आहे, असंही राहुल द्रविडने सांगितलं होतं. राहुल द्रविड नोव्हेंबर 2021मध्ये टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रुजू झाला होता. नुकताच वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला होता. दरम्यान, आता बीसीसीआयने या कार्यकाळात वाढ केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT