Team India: मोहालीत विजय मिळूनही रोहित शर्मा टेन्शनमध्येच; स्वत:च पेचात अडकला

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला पहिला T20 सामना जिंकला. दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु या सामन्याआधी रोहित शर्माला एका प्रश्नाने चिंतेत पडलाय. कारण या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करत आहे, त्यामुळे रोहित कोणाला संघातून बाहेर करावं या प्रश्नात तो अडकलाय.
Rohit Sharma
Rohit Sharma7cric Cricket
Published On

Rohit Sharma in Tension for Virat kohali:

भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला ज्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडियाने या मालिकेत १-०अशी आघाडी घेतलीय.आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल. परंतु या सामान्याआधी रोहित शर्मा चिंतेत पडलाय. या सामन्यात विराट कोहलीचं पुनरागमन होणार आहे.कोहलीच्या पुरागमनाने रोहित शर्मा संकटात सापडलाय. काय आहे कारण ते जाणून घेऊ.. (Latest News)

कोहली आल्यानंतर कोणत्या खेळाडूला बाकावर बसावं रोहितला समजत नाहीये. इंदूरमध्ये (Indore) खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये (Team India) एक बदल करण्यात येणार आहे. कारण या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करणार आहे. मुलीच्या वाढदिवसासाठी विराटने पहिल्या सामन्यातून माघार घेतली होती. पण कोहली आता संघात सामील झाला असून तो दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार हे निश्चित असल्याने रोहितचं टेन्शन वाढलंय. कोहलीला संघात स्थान दिल्यानंतर टीम इंडियाच्या (Team India) प्लेइंग ११ मधून कोणत्यातरी खेळाडूला बाकावर बसावे लागेल.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय सांगतो विराटचा ट्रक रेकॉर्ड

कोहलीने २०२२ साली झालेल्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत शेवटचा टी-२० सामना खेळला होता. यानंतर तो आणि रोहित टी-२० मधून ब्रेकवर होते. दरम्यान या वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळेच या दोघांची अफगाणितास्तानच्या मालिकेत निवड करण्यात आलीय.ही मालिका वर्ल्डकप पूर्वीची भारताची शेवटची टी-२० मालिका आहे.

या स्थितीत कोहली खेळणार हे निश्चित आहे. आता रोहित कोणाला वगळणार हा प्रश्न निर्माण झालाय. कोहलीच्या आगमनाचा फटका जर कोणाला बसेल तो तिलक वर्माला बसू शकतो. गेल्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. त्याची कामगिरीही विशेष नव्हती. त्यामुळे कोहलीला खेळवण्यासाठी रोहित तिलकला वगळण्याची दाट शक्यता आहे.

गिलही बाहेर जाणार का?

याशिवाय रोहित आणखी एक बदल करू शकतो. गेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली. जयस्वालच्या पायाला दुखापत झाल्याने तो पहिला सामना खेळला नाही. त्याच्या जागी गिलला पुन्हा संधी मिळाली. दुसऱ्या सामन्यात जयस्वाल तंदुरुस्त राहिल्यास गिलला बाहेर जावे लागू शकते.

Rohit Sharma
Who Is Dhruv Jurel : बॅट घ्यायलाही पैसे नव्हते, टीम इंडियात अचानक एन्ट्री; कोण आहे ध्रुव जुरेल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com