rahul dravid with rohit sharma google
Sports

Team India News: न्यूयॉर्कच्या मैदानावरून पेटला वाद? सामन्याआधी भारतीय खेळाडूंना राहुल द्रविडने दिली वॉर्निंग

Rahul Dravid On Team India: भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत. याच मैदानावर भारत - बांगलादेश यांच्यातील सराव सामना पार पडला होता. दरम्यान पहिल्या सामन्यापूर्वी राहुल द्रविड यांनी भारतीय खेळाडूंसोबत दीर्घकाळ चर्चा केली आहे.

नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे नव्याने उभारण्यात आलेलं स्टेडियम आहे. या मैदानावर राहुल द्रविड यांना खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची चिंता सतावतेय. भारतीय संघाचे आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकाविरुद्ध होणारे सामने हे याच मैदानावर होणार आहेत.

काय म्हणाले राहुल द्रविड?

बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणाले की, 'मैदानावरील जमीन भुसभुशीत आहे. त्यामुळे खेळाडूंना हॅम्स्ट्रिंगचा त्रास होऊ शकतो. आम्हाला यावर मेहनत घ्यावी लागेल आणि खेळाडूंनाही काळजी घ्यावी लागेल. आम्ही खरंच चांगली कामगिरी केली आहे.'

भारताचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सराव सामना पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १२२ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६० धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT