मेलबर्न : राफेल नदालने (Rafael Nadal) आज ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2022) मार्कोस गिरॉनचा (Marcos Giron) पराभव करुन २१ व्या ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदासाठी मी तयार असल्याचे सिद्ध केले आहे. (Rafael Nadal wins first round against Marcos Giron at the Australian Open 2020)
नदालने (rafael nadal) जागतिक क्रमवारीत ६६ व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या (amercia) मार्कोस गिरॉनला ६-१, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवलं. नदालने त्याच्या पहिल्या सर्व्हिसवर फक्त आठ गुण गमावले. तो आत्मविश्वासाने खेळत हाेता. त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे तो त्रासलेला दिसत नव्हता.
अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डाने ब्रिटनच्या १२ व्या नामांकित कॅमेरॉन नॉरीला ६-३, ६-०, ६-४ असे पराभूत केले. अन्य सामन्यांच्या निकालांत पुरुषांत ३१ व्या क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्काराझने अलेजांद्रो ताबिलोवर ६-२, ६-२, ६-३ असा विजय मिळवला. १७ व्या क्रमांकावर असलेल्या गेल मॉनफिल्सने फेडेरिको कोरियाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. १४ व्या क्रमांकावर असलेल्या डेनिस शापोवालोव्हने सर्बियाच्या लास्लो जेरेचा 7-6 (3), 6-4, 3-6, 7-6 (3) असा पराभव केला.
edited by : siddharth latkar
नदालने आज ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ७० वा सामना जिकंला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.