Rafael Nadal Australian Open 2022 Champion Saam TV
क्रीडा

Australian Open 2022: राफेल नदाल द किंग ऑफ टेनिस

राफेल नदालने सन २००७ मध्ये विम्बल्डनमध्ये दोन सेट गमावल्यानंतर सामना जिंकला होता. त्यावेळी त्याच्याकडे तीन ग्रँड स्लॅम जेतेपद होते.

साम न्यूज नेटवर्क

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन 2022 (australian open 2022) मधील पुरुषांच्या एकेरीत सहाव्या मानांकित राफेल नदाल (rafael nadal) आणि दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव (daniil medvedev) यांच्यात लढतीत (rafael nadal vs daniil medvedev) दाेन सेट पिछाडीस असलेल्या राफेल नदालने स्वतःचे मनाेबल सातत्याने वाढवत काैशल्याने खेळ करुन मेदवेदेवला हरवत करंडकावर आपले नाव काेरले. विशेष म्हणजे स्पेनचा दिग्गज टेनिसपटू असलेल्या राफेल नदालने आज २१ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदास गवसणी घालून विश्वविक्रमी कामगिरी केली. नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानी हाेता. त्याच्यासह स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत. (Nadal beats Medvedev to win record 21st Grand Slam title)

rafael nadal & daniil medvedev

राफेल नदालने नाणेफेक जिंकून सर्व्हिस करण्याचा निर्णय घेतला.

रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने (daniil medvedev) स्पेनच्या सहाव्या मानांकित राफेल नदाल (rafael nadal) विरुद्ध पहिला सेट ६-२ असा जिंकला. प्रारंभी नदालने एक गुण मिळविला. त्याला प्रत्युत्तर देत मेदवेदेवने गुण मिळविला. त्यानंतर नदालने २-१ अशी आघाडी घेतली. मेदवेदेवची सर्व्हिस नदालला भारी पडली. मेदवेदेवने आक्रमकरित्या बॅकहँडचा वापर करीत २-२ असे समान गुण केले. त्यानंतर (australian open 2022 final) मेदवेदेवचा खेळ बहरत गेला. त्याने हा सेट ६-२ असा जिंकला.

daniil medvedev

दूसरा सेट चूरशीचा झाला. यामध्ये राफेल नदालने आघाडी घेतली हाेती. परंतु मेदवेदेवने उत्तम खेळ करीत दुसरा सेट टायब्रेकमध्ये गेला. पुन्हा एकदा मेदवेदेवने नदालला टक्कर देत दूसरा सेटवर आपला शिक्का माेर्तब केला. खरंतर हा सेट नदालकडे (rafael nadal latest marathi news) जाईल असं वाटत हाेते. परंतु बॅकहॅंडचा मास्टर मेदवेदेवने नदालवर ६-७ अशी मात केली. (nadal vs medvedev australian open 2022 final latest marathi news)

अन् प्रेक्षकांचा एकच गलका

मेदवेदेवने (daniil medvedev latest marathi news) तिसऱ्या सेटचा प्रारंभ केला. या सेटमध्ये नदालने फोरहँड्सच्या मदतीने वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला यामध्ये यश आले. त्याने हा सेट ६-४ असा जिंकला. पहिल्या आणि दुस-या सेटमध्ये ७-६ (७/५), ६-२ नदाल पिछाडीवर पडला हाेता. त्याने स्वतःचे मनोबल कायम राखत तिस-या सेटमध्ये यश मिळविताच प्रेक्षकांनी एकच गलका केला. (australian open 2022 marathi news)

Rafael Nadal

नदालचे रोमांचक पुनरागमन!

नदालने चौथा सेट ६-४ असा जिंकून अंतिम फेरी निर्णायक सेटवर नेली. सुमारे चार तास सुरु असलेल्या या लढतीत दाेन्ही खेळाडू एक एक गुण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेताना दिसले. मेदवेदेवला क्रॅम्प येत हाेते. परंतु ताे त्यातून सावरत खेळताना दिसला.

daniil medvedev

डॅनिल मेदवेदेवच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा सामना ठरला आहे. यापुर्वी २०१९ च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत नदालविरुद्ध ताे ४ तास ५४ मिनिटं खेळला हाेता.

आजच्या सामन्यातील पाचव्या सेटमध्ये नदालने उत्तम आघाडी घेतली हाेती. मेदवेदेवने त्यास प्रत्युत्तर दिले मात्र नदालने हा सेट ७-५ असा जिंकून करंडकावर आपले नाव काेरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT