r ashwin twitter
Sports

Champions Trophy: रोहित- राहुल Out..अश्विनने निवडला 11 खेळाडूंचा संघ; या 4 भारतीयांना दिलं स्थान

R Ashwin Playing XI: भारतीय संघाचा खेळाडू आर अश्विनने चॅम्पियन्स ट्रॉफीतील बेस्ट ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत अजेय राहून भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. कुठल्या एका खेळाडूमुळे नव्हे, तर सर्व खेळाडूंनी मिळून भारताला विजय मिळवून दिला. भारतीय खेळाडूंचं कौतुक होत असताना, आर अश्विनने या स्पर्धेतील ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात त्याने केवळ ४ भारतीय खेळाडूंना स्थान दिलं आहे.

आर अश्विनने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी करणाऱ्या ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघाची निवड केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने मोहम्मद शमी आणि रोहित शर्माला स्थान दिलेलं नाही. तर केवळ ४ भारतीय खेळाडूंना आपल्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. रोहित, शमीसह त्याने हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि अक्षर पटेलसारख्या खेळाडूंनाही या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलेलं नाही.

या फलंदाजांना दिलं स्थान

आर अश्विनने सलामीवीर फलंदाज म्हणून न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रविंद्र आणि इंग्लंडच्या बेन डकेटला स्थान दिलं आहे. रचिन रविंद्रची या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तर डकटनेही धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची निवड केली आहे.

या गोलंदाजांना दिलं स्थान

अश्विनने आपल्या प्लेइंग ११ मध्ये गोलंदाज म्हणून भारताच्या वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवची निवड केली आहे. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्लाह उमरजई, न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवे, ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिस आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरची निवड केली आहे.

या स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने मिळून फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह वेगवान गोलंदाज म्हणून एकमेव गोलंदाज मॅट हेनरीची निवड केली आहे. हेनरीने या स्पर्धेत गोलंदाजी करताना ४ सामन्यांमध्ये १० गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT