Quinton de Kock retire after South Africa's World Cup 2023 semi-final defeat against Australia Saam TV
Sports

World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; उपांत्य फेरीतील पराभवानंतर स्टार खेळाडूची निवृत्ती

World Cup 2023 Semi Final: दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू वनडेतून निवृत्त झाला आहे. हा खेळाडू दुसरा कुणीही नसून क्विंटन डी कॉक आहे.

Satish Daud

South Africa vs Australia World Cup 2023 Semi Final

आयसीसी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ३ विकेट्सनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक दिली असून आता त्यांचा सामना टीम इंडियाची होणार आहे. दरम्यान, या पराभवासह दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू वनडेतून निवृत्त झाला आहे. हा खेळाडू दुसरा कुणीही नसून क्विंटन डी कॉक आहे. तसं पाहता डी कॉकने विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

दक्षिण आफ्रिकेने जेव्हा भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला, त्याचवेळी क्विंटन डी कॉकच्या वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची बातमी आली होती. क्विंटन डी कॉकने स्पष्ट केले होते की, भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना त्यांच्या शेवटचा सामना ठरला आहे. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये डि कॉकने दमदार खेळ केला. त्याने १० सामन्यात ५९४ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे.

आफ्रिका संघाकडून सर्वाधिक करणारा खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने ४ शतके केली होती. डी कॉकच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १५५ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ४५.७४ च्या सरासरीने ६,६७० धावा केल्या आहेत. यामध्ये २१ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT