Harbhajan singh advice to coach Jayawardene saam tv
Sports

MI vs DC: इगो बाजूला ठेवा…! रोहितला इग्नोर करणाऱ्या कोच जयवर्धनेला हरभजनचा सल्ला!

Rohit Sharma Masterstroke: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कोच महेला जयवर्धनेने रोहित शर्माचा सल्ला ऐकला नाही. दरम्यान रोहितच्या याच निर्णयामुळे टीम जिंकली. यावरूनच हरभजनने जयवर्धनेला टोला लगावला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

रविवारी मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील दुसरा सामना जिंकला. हा सामना जिंकवण्यामध्ये माजी कर्णधार रोहित शर्माचं मोठं योगादान असल्याचं म्हटलं जातंय. याशिवाय रोहित शर्माचा डगआऊटमधील एक व्हिडीओ व्हायरल होत होता. मात्र अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने MI च्या कोचवर प्रश्न उपस्थित केले आहेत. असं म्हटलं जातंय की, जयवर्धनेनेरोहित शर्माच्या एका गोष्टीवर ठेंगा दाखवला, मात्र तिच गोष्ट मास्टर स्ट्रोक ठरली.

रोहित शर्माच्या मास्टर स्ट्रोकची चर्चा

झालं असं की, दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करत असताना ७ वया ओव्हरमध्ये रोहित शर्मा डगआऊटमध्ये गेला. यानंतर त्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कर्ण शर्माला पाठवलं. मात्र कोच जयवर्धनेला ते मान्य नव्हतं. सुरुवातीला त्याने नकार दिला मात्र त्यानंतर तो तयार झाला.

मात्र हीच गोष्ट सामन्यासाठी टर्निंग पॉईंट ठरताना दिसली. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कर्ण शर्माने ३ विकेट्स घेतले. यामध्ये कर्णने अभिषेक पोरेल, केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांची विकेट घेतली. मुख्य म्हणजे या तीन विकेट्समुळे संपूर्ण सामना फिरला.

You Tube वर हरभजनने सांगितला घटनाक्रम

या सामन्यानंतर स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर हरभजन सिंहने संपूर्ण घटनाक्रम सविस्तर सांगितला. यावेळी हरभजनने सांगितलं की, रोहित शर्माने मास्टर स्ट्रोक खेळला. त्याने हेड कोच महेला जयवर्धनेला कर्ण शर्माला इम्पॅक्ट सब म्हणून उतरवण्यास सांगितलं. मात्र जयवर्धने त्यासाठी तयार नव्हता. जर जयवर्धनेचं ऐकलं असतं तर मुंबई सामना हरली असती. मात्र रोहित तिथे होता आणि त्याने योग्य पाऊल उचललं. तो कर्णधार आहे, त्यामुळे तो एका कर्णधारासारखा विचार करतो. शेवटी कॅप्टन हा कॅप्टन असतो.

हरभजनने LSG विरूद्ध तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याच्या निर्णयावर देखील टीका केली होती. तो म्हणालेला, जर याठिकाणी रोहित असता तर त्याने असा निर्णय घेतला नसता. कर्ण शर्माच्या अटॅकवर ३ विकेट्स आले आणि सामना पलटला. हे खूप चांगल पाऊल होतं. त्याचप्रमाणे रोहित जर LSG विरूद्ध डगआऊटमध्ये असता तर तिलक वर्माला रिटायर्ड आऊट केलं नसतं. जयवर्धनेची ती त्यादिवशीची मोठी चूक होती.

हरभजन पुढे म्हणाला की, कधी-कधी कोचने इगो बाजूला ठेवणं गरजेचं असतं. टीमला कशी मदत मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Heel Side Effects: सतत हिल सॅन्डल्स घातलताय, होऊ शकतात या समस्या

Kala Vatana Usal: पावसाळ्यात बनवा झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ, चव वाढवण्यासाठी वापरा 'ही' खास ट्रिक

Maharashtra Live News Update: सलग चौथ्या दिवशी उधाणाचा कोकण किनारपट्टीला फटका

BMC निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कसली कंबर, ८ शिलेदार निवडले, कोणकोणत्या नेत्याला संधी?

AI in Heart Surgery: सोलापुरात एआयच्या मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी|VIDEO

SCROLL FOR NEXT