रविवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला. एलएसजीला या सामन्यात ३७ रन्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यामध्ये पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या विजयासोबत पंजाबच्या टीमने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. दरम्यान केकेआर आणि पंजाबच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलचं गणित बदललं आहे.
आरसीबीची टीम आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आतापर्यंत या टीमने एकूण ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ८ सामन्यांमध्ये विजय मिळवणं त्यांना शक्य झाला आहे. एकूण १६ पॉईंट्ससह आरसीबीची टीम पॉईंट्स टेबलच्या पहिल्या स्थानी आहे.
लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर पंजाब किंग्सच्या टीमने चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टीमने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ७ विजय मिळवले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे १५ पॉईंट्ससह ही टीम सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.
पंजाब किंग्सच्या विजयाने मुंबई इंडियन्सच्या टीमचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. मुंबईची टीम दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईनेही ११ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून १४ पॉईंट्स त्यांच्या खात्यात आहेत. या टीमचं नेट रन रेट 1.274 आहे. तर गुजरात टायटन्स चौथ्या नंबरवर पोहोचली आहे.
गुजरात टायचन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी या ४ टीम्स सध्ये प्लेऑफच्या रेसमध्ये पुढे आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिट्ल, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या टीम्स देखील प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सच्या प्लेऑफच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. या दोन्ही टीम्सने यंदाच्या वर्षी फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे दोन्ही टीम्स प्लेऑफच्या बाहेर गेल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.