Indian Wheelchair Cricketer Vikram Singh Dies in Train After Medical Negligence  Saam TV News
Sports

Shocking : भारतीय क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, ३ तास तडफडत राहिला पण...

Indian wheelchair cricketer Vikram Singh : विक्रम सिंग या ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटूचा छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये वैद्यकीय मदतीअभावी मृत्यू झाला. ग्वाल्हेरमध्ये क्रिकेट स्पर्धेसाठी जात असताना, तब्येत बिघडल्यावर तीन तास मदतीची वाट पाहिली पण मदत मिळाली नाही. रेल्वेच्या निष्काळजीपणावर टीका.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Vikram Singh differently-abled cricketer death in train : ३८ वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग याचा ट्रेनमध्येच तडफडून मृत्यू झाला. तीन तास ट्रेनमध्ये उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. बुधवार, ४ जून रोजी मथुराजवळ छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये विक्रम सिंग याचा मृत्यू झाला. विक्रम ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेसाठी ट्रेनमधून निघाला होता. प्रवासादरम्यान विक्रमची प्रकृती अचानक बिघडली. तब्बल तीन तास त्याने वैद्यकीय मदतीची वाट पाहिली. पण उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

विक्रम सिंग हा पंजाबच्या पिहडी गावातील दिव्यांग क्रिकेटपटू आहे. विक्रम सिंग याचं छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये निधन झाले. ते दिल्लीच्या निजामुद्दीन स्थानकावरून ११ खेळाडूंसह ग्वाल्हेरमध्ये नॅशनल व्हीलचेयर क्रिकेट स्पर्धेसाठी जात होते. पण रेल्वे प्रवासादरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने रेल्वेतच अखेरचा श्वास घेतला.

विक्रम याची तब्येत खराब झाल्यानंतर तात्काळ रेल्वे हेल्पलाइन १३९ वर सकाळी संपर्क साधण्यात आला. रेल्वेकडून मथुरा स्थानकावर डॉक्टर उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. पण अझाई स्थानकावरच रेल्वे तब्बल दीड तास थांबली. या काळात विक्रम याला कोणतीही वैद्यकीय सेवा मिळाली नाही. त्यामुळे प्रकृती आणखी खालावली. ज्यावेळी रेल्वे मथुरा स्थानकावर पोहोचली, त्यावेळी उशीर झाला होता. उपचार न मिळाल्याने विक्रम यांनी श्वास सोडला होता.

विक्रम यांच्या सहकारी खेळाडूंनी रेल्वेच्या निष्काळजीपणाला मृत्यूसाठी जबाबदार ठरवले. "तीन तास विक्रम तडफडत होता, पण वेळेवर उपचार मिळाले नाहीत," असे त्यांनी सांगितले. इंडियन व्हीलचेयर क्रिकेट संघाचा कर्णधार सोमजीत सिंग गौर यांनी सोशल मीडियावर विक्रम यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT