आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा दुबईत पार पडला. हा लिलाव झाल्यानंतर प्रीती झिंटा सोशल मीडियावर ट्रेन्ड करतेय. ट्रेन्ड करण्याचं कारण म्हणजे एकाच नावाच्या खेळाडूमुळे उडालेला गोंधळ. नाव सेम टू सेम, त्यात बेस प्राईजही सेम. इथेच पंजाब किंग्ज आणि प्रीती झिंटाकडून चूक झाली. या खेळाडूचं नाव आहे शशांक सिंग.
या लिलावात ३२ वर्षीय शशांक सिंगला पंजाब किंग्जने २० लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या संघात स्थान दिलं. मात्र पंजाबला हा शशांक नको होता. त्यांना १९ वर्षीय शशांक सिंगवर बोली लावायची होती. मात्र बोली भलत्याच शशांक सिंगवर लागली.
या लिलावात पंजाब किंग्ज संघाकडून ट्रेव्हिस बेलिस, संजय बांगर, संघमालक नेस वाडिया आणि प्रीती झिंटा यांनी हजेरी लावली होती. मोठ्या स्क्रिनवर जेव्हा शशांक सिंगचं नाव पुकारलं गेलं त्यावेळी केवळ पंजाब किंग्जनेच बोली लावली.
इतर कुठल्याही फ्रेंचायझीने बोली न लावल्याने तो २० लाखांच्या बेस प्राईजवर पंजाबच्या संघात दाखल झाला. ही चूक कळताच त्यांनी खेळाडू बदलून घेण्याची मागणी होऊ लागली. मात्र असं होऊ शकलं नाही. सोशल मीडियावर ही चर्चा रंगायला सुरु होताच शशांक सिंगला ट्रोल केलं जातंय. दरम्यान ३२ वर्षीय शशांकचा एक असा रेकॉर्ड आहे जो आजवर कोणालाच मोडता आलेला नाही. (Latest sports updates)
शशांक सिंग आहे तरी कोण?
शशांक सिंगने यापूर्वी आयपीएलही आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून आला आहे. गेल्या हंगामात त्याला सनरायझर्स हैदराबादकडून १० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १७.२५ च्या सरासरीने अवघ्या ६९ धावा केल्या.
शशांकच्या नावे ज्या रेकॉर्डची नोंद आहे, तो रेकॉर्ड त्याने आयपीएल स्पर्धेत नव्हे तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत केला आहे. या स्पर्धेत मणिपूर आणि छत्तीसगड या दोन्ही संघांमध्ये सामना सुरु होता. या सामन्यात छत्तीसगड संघाकडून खेळणाऱ्या शशांक सिंगने फलंदाजीत १५० धावा चोपल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ५ गडी देखील बाद केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. हा रेकॉर्ड आजवर कोणालाच मोडता आलेला नाही.
आयपीएल २०२४ साठी पंजाब किंग्ज संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टन, रिले रौसो, जितेश शर्मा, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, ऋषी धवन, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, शिवम , हरप्रीत भाटिया, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, प्रिन्स चौधरी, तनय त्यागराज आणि विद्वथ कवेरप्पा,राहुल चहर, कागिसो रबाडा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.