KKR VS PBKS IPL Match
KKR VS PBKS IPL Match Saam tv
क्रीडा | IPL

KKR VS PBKS IPL Match: शिखर धवनची तुफानी खेळी; पंजाबकडून कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे आव्हान

Vishal Gangurde

Kolkata Knight Riders vs Punjab Kings IPL 2023 Match: आयपीएल २०२३ स्पर्धेचा ५३ वा सामना हा कोलकाता आणि पंजाबच्या संघामध्ये होत आहे. दोन्ही संघ ईडन गार्डन स्टेडियमवर भिडत आहेत. पंजाबने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाला सात गडी गमावून १८० धावांचे आव्हान दिले आहे. (Latest Marathi News)

नीतीश राणाच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाची फलंदाजी सुरुवात चांगली झाली. प्रभसिमरनला सुरुवातीलाच तीन चौकार ठोकले. मात्र, दुसऱ्या षटकात प्रभसिमरनला बाद केले. प्रभसिमरनने अवघ्या १२ धावा केल्या. त्यानंतर भावुनका राजपक्षे ३ चेंडू खेळून बाद झाला.

पंजाबचे दोन गडी बाद झाल्यानंतर शिखर धवनने संघाची कमान सांभाळली. पुढे चक्रवर्तीने पंजाबचा चौथा गडी बाद केला. चक्रवर्तीने १३ व्या षटकात जितेश शर्माला बाद केले.

जितेश शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन माघारी परतला. शिखरने ४७ चेंडूत ५७ धावा कुटल्या. शिखरने डावात ९ चौकार आणि १ षटकार लगावला.

ऋषि धवनला चक्रवर्तीने १७ व्या षटकात बाद केले. ऋषिने ११ चेंडूत १९ धावा कुटल्या. तर सॅम १८ व्या षटकात यष्टीरक्षकाला झेल देऊन बाद झाला. तर २० व्या षटकात केकआरच्या शाहरुखने दोन चौकार आणि १ षटकार लगावला. तर हरप्रितने १ षटकार लगावला. पंजाबच्या संघाने २० षटकात कोलकाताला १८० धावांचे आव्हान दिले. (IPL Match)

कोलकाता संघ संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी

आयपीएल २०२३ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी नीतीश राणाच्या हाती सोपवण्यात आली आहे.

मात्र या संघाला १० पैकी केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. जर या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT