Namdeo Kumbhar
महिना संपण्यापूर्वीच तुमचा सिलेंडर संपतो का? तुम्ही स्वयंपाकघरात अशा चुका करत आहात का? पण काही सोप्या किचन हॅक्सने करा स्वयंपाकाच्या गॅसची मोठी बचत
गॅसवर भांडे ठेवण्यापूर्वी ते कापडाने स्वच्छ पुसून घ्या. ओली भांडी वाळण्यातच खूप गॅस खर्च होतो.
कढई किंवा पातेल्यावर झाकण ठेवल्यास वाफेमुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसची बचत होते.
दूध, भाजी किंवा पीठ फ्रीजमधून काढल्यावर लगेच गरम करू नका. ते आधी सामान्य तापमानावर येऊ द्या.
भाजी कापणे, मसाले काढणे ही कामे गॅस पेटवण्यापूर्वीच उरकून घ्या. गॅस चालू ठेवून तयारी करू नका.
उघड्या भांड्यांपेक्षा प्रेशर कुकरमध्ये अन्न ५०% वेगाने शिजते. डाळ-भात नेहमी कुकरमध्येच बनवा.
मूग, हरभरे किंवा डाळी शिजवण्यापूर्वी १-२ तास पाण्यात भिजत ठेवल्यास त्या गॅसवर पटकन शिजतात.
बर्नर खराब असल्यास पिवळी ज्वाला निघते आणि गॅस वाया जातो. बर्नर नियमितपणे स्वच्छ ठेवा.
भांड्याच्या आकारानुसारच लहान किंवा मोठा बर्नर वापरा. फ्लेम भांड्याच्या तळाबाहेर जाता कामा नये.