Pro Kabaddi League Final 2024 Saam Tv
क्रीडा

PKL 10 final: पुण्याच्या पलटणने मारलं मैदान, हरियाणाला केलं चितपट; PKL ट्रॉफीवर कोरलं नाव

Pro Kabaddi League Final 2024: पुणेरी पलटणने चमकदार कामगिरी करत प्रो कबड्डी स्पर्धाच्या १० व्या हंगामाचे विजेतेपद पटकावलं आहे. पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा २८-२५ असा पराभव केला.

साम टिव्ही ब्युरो

Pro Kabaddi League Final:

पुणेरी पलटणने चमकदार कामगिरी करत प्रो कबड्डी स्पर्धाच्या १० व्या हंगामाचे विजेतेपद पटकावलं आहे. पुणेरी पलटण संघाने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद जिंकलं आहे. प्रो कबड्डी लीग (PKL) २०२४ चा महाअंतिम फेरी हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात खेळली गेली. हैदराबादच्या जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा २८-२५ असा पराभव केला.

गेल्या हंगामात पुणेरी पलटण पीकेएल फायनलमध्ये जयपूर पिंक पँथर्सकडून पराभूत होऊन उपविजेते ठरले होते. हरियाणा स्टीलर्स संघाने पहिल्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणेरी पलटण Vs हरियाणा स्टीलर्स

आतापर्यंत पुणेरी पलटण हरियाणा स्टीलर्स यांच्यात १५ सामने खेळेल गेले आहेत. यात ९ सामन्यांमध्ये पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा पराभव केला आहे. तर ५ सामन्यात हरियाणा स्टीलर्स जिंकली आहे. यातच एक सामना बरोबरीवर सुटला आहे.  (Latest Marathi News)

पुणेरी पलटणचा आतापर्यंतचा कसा राहिला प्रवास?

पीकेएलमध्ये सलग अंतिम फेरी गाठणारा पुणेरी पलटण हा यू मुंबा, पाटणा पायरेट्स, गुजरात जायंट्स आणि दबंग दिल्लीनंतरचा पाचवा संघ ठरला.

उपांत्य फेरीत त्यांनी तीन वेळचा गतविजेता आणि चार वेळा अंतिम फेरीत आलेल्या पाटणा पायरेट्सचा ३७-२१ अशा गुणांनी पराभव केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT